IMPIMP

Panvel Crime News | CBI चौकशीला कंटाळून सीमा शुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या, तलावात आढळला मृतदेह; प्रचंड खळबळ

by sachinsitapure
Suicide Case

पनवेल : सरकारसत्ता ऑनलाईन – Panvel Crime News | खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या (Taloja Central Jail) जवळ असलेल्या तलावात शुक्रवारी (दि.25) एक मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी (Kharghar Police) घटनास्थळी धाव घेत आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. (Panvel Crime News) तरुणाची ओळख मयंक सिंग (Mayank Singh) अशी असून तो सीमाशुल्क अधिकारा असल्याचे समोर आले आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्याने आत्महत्या (Customs Officer’s Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मयंक सिंग हे तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत होते. खारघर पोलिसांनी
(Kharghar Police Station) केलेल्या तपासात मयंक सिंग यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी
(CBI Inquiry) सुरु असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात तपास सुरु असून यावर लगेच भाष्य करणे योग्य
नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ (Senior PI Rajiv Shejwal) यांनी सांगितले. मयंक यांची मोटार त्यांनी तलावापासून काही अंतरावर उभी केली होती.

दरम्यान, तळोजा तुरुंगाजवळील तलावात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे.
या तलावाशेजारी गाडी धुणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच अनेक पर्यटक किंवा वर्षासहलीसाठी आलेले तरुण
तलावातील पाण्याचा अंदाज न घेता पोहण्यासाठी उतरतात. या तलावाला संरक्षण कुंपण घालण्याची मागणी होत आहे.

 

Related Posts