IMPIMP

Pune Crime News | लोणी काळभोर : महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, भररस्त्यात मारहाण करुन विनयभंग

by sachinsitapure
rape case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | महिलेकडे शारीरिक संबंधाची (Physical Relationship) मागणी करुन तिला भररस्त्यात मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका 40 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील दोन महिन्यापासून ते रविवारी (दि.11) सकाळी अकराच्या दरम्यान उरुळी देवाची येथे घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत उरुळी देवाची येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने रविवारी (दि.19) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन दत्ता रामभाऊ होळकर Dutta Rambhau Holkar (वय-40 रा. होळकरवाडी, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 354ड, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांचा मागील दोन महिन्यापासून वारंवार पाठलाग केला. त्या रस्त्याने जात येत असताना दत्ता होळकर याने महिलेचा हात पकडून शाररीक संबंधाची मागणी करुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. शनिवारी (दि.19) सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी यांचा पाठलाग करुन त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Related Posts