IMPIMP

Pune Crime News | आत्महत्या करण्याची धमकी देऊन 17 वर्षीय मुलीचा मानसिक छळ, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा; कोंढवा परिसरातील घटना

by sachinsitapure
Minor Girl Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी देऊन तिचा मानसिक छळ केल्या प्रकरणी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2023 ते गुरुवार (दि.14) दरम्यान शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथे घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने (वय-35) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रमजान अब्बाज पटेल (वय-19 रा. शिवनेरीनगर, गल्ली नं. 23, कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 354 ड, सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी पुणे कॅम्पमधील वेस्टर्न कॉम्प्लेक्स
(Western Complex Pune Camp) येथे कामाला आहे. तर आरोपी रमजान पटेल हा देखील त्याठिकाणी कामाला आहे.
आरोपीने मागील काही दिवसांपासून फिर्यादी यांच्या मुलीचा वारंवार कामाच्या ठिकाणी आणि घरी जाताना पाठलाग केला.
गुरुवारी फिर्यादी यांची मुलगी घरी येत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच तिला ‘तु मला आवडते, तु
जर माझ्यासोबत बोलली नाही तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी देऊन तिचा विनयभंग (Molestation) केला.
मुलीने याबाबत घरात सांगितले असता मुलीच्या आईने कोंढवा पोलिसांत धाव घेत आरोपी विरोधात फिर्य़ाद दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात (API Thorat) करीत आहेत.

Related Posts