IMPIMP

Pune Fire News | वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्तीचा झाला गोळा, लॉकर मात्र वाचले व्हिडिओ

by sachinsitapure
Pune Fire News | Fire at a jeweler's shop in Wanwadi; The silver idol was collected, but the locker was saved

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Fire News | वानवडी येथील सोळंके ज्वेलर्स (Solanke Jewelers Wanavadi) या दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले. त्यात शोकेसमध्ये ठेवलेल्या चांदीच्या मूर्ती (Silver Idols) आणि इतर वस्तू आगीत सापडल्याने त्या वितळून त्यांचा गोळा झाला. लॉकरमध्ये सोन्याचे दागिने (Gold Jewelry) ठेवले असल्याने ते मात्र वाचले. (Pune Fire News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वानवडी येथील परमार पार्क सोसायटीत सोळंके ज्वेलर्स या दुकानाला सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. दुकानातून धुर येत असल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाला (Fire Brigade) सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी वर्दी दिली. कोंढव्यातील अग्निशमन दलाच्या केंद्रातून तातडीने एक गाडी घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी शटर उचकटून पाण्याचा मारा करुन आग विझविली. तसेच शेजारील दुकानात ही आग पसरणार नाही, याची काळजी घेतली. या शोकेसमध्ये चांदीच्या मूर्ती व इतर वस्तू ठेवल्या होत्या. आगीत त्या वितळून त्यांचा गोळा झाला. सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. ते अग्निशमन दलाने वाचविले. या आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झाले. (Pune Fire News)

आग विझविताना निलेश वानखेडे यांचा हाताला काच लागून ते जखमी झाले.

कोंढवा केंद्राचे अधिकारी कैलास शिंदे, तांडेल महादेव मांगडे, फायरमन सागर दळवी,
निलेश वानखेडे, दिनेश डगळे, चालक सत्यम चौखंडे यांनी ही आग विझविली.
शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

Related Posts