IMPIMP

Pune Crime News | क्रौर्याची परिसिमा ! पत्नीच्या अंगावर लघवी करुन हीटरने गुप्तांगाला दिले चटके; भाजलेल्या अवस्थेत बलात्कार करणार्‍या पतीला अटक

by nagesh
Pune Crime News | The limits of cruelty! Heater urinates on wife's genitals; Arrested husband who raped her in burnt state, rape in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पत्नीचे हात पाय बांधून तिच्या गुप्तांगाला (Private Part) त्याने हीटरने चटके दिले.
भाजलेल्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केला. तिच्या अवघड जागेत तेलाची बाटली घालून अतिशय क्रुरपणे छळ करुन तिच्या
तोंडावर लघवी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कोंढव्यातील एका ४० वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी दुपारी १ ते रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली. क्रौर्याची परिसिमा गाठलेल्या या प्रकाराने पोलीसही स्तब्ध झाले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ४ मुले आहेत. फिर्यादीच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून त्यांच्या पतीला संशय आला. फिर्यादी या कोणाबरोबर बोलत तर नाही ना म्हणून तो त्यांना हाताला धरुन बेडरुममध्ये घेऊन गेला. मुले ओरडत असताना फिर्यादीला नग्न करुन त्यांचे हातपाय बांधले. हीटर गरम करुन त्यांच्या लघवीच्या व शौचाच्या जागेवर चटके दिले (Crime Against Woman). दोन्ही ठिकाणी भाजलेले असताना क्रुररीतीने त्यांच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) केले. त्यानंतर तेलाची बाटली त्यांच्या शौचाच्या जागेत घातली.

 

त्यांच्या तोंडावर लघवी केली. तुला खूप माज आला आहे. तुझा माज उतरवितो, म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी यांच्या डोक्यात, हाता पायावर खलबत्याने मारहाण केली. त्यांचा आरडा ओरडा ऐकून बाहेरुन मुलेही अधिक आरडा ओरडा करु लागली. तेव्हा त्याने दरवाजा उघडला. फिर्यादीची १६ व ११ वर्षाची मुलगी त्यांच्याकडे आल्या असताना ही मुले देखील माझी आहेत की नाही असे म्हणून मुलीबरोबर देखील सेक्स करुन काय हालत करतो, असे म्हणाला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) पतीला अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | The limits of cruelty! Heater urinates on wife’s genitals; Arrested husband who raped her in burnt state, rape in pune

 

हे देखील वाचा :

Senior Journalist Digambar Darade | वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे लिखीत ‘ऋषी सुनक’ ठरतेय ‘बेस्ट सेलर’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – नाना गायकवाड याच्यावर हल्ला करणार्‍या कैद्यावर येरवडा कारागृहात हल्ला; तशाच पद्धतीने केला हल्ला

Vandaniya Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | गरिबांसाठी आपला दवाखाना उपयुक्त ठरेल – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

 

Related Posts