IMPIMP

Pune Crime News | पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

by nagesh
Pune Crime News | Threatening Kill To NCP City president Prashant Jagtap’s brother wanwadi Police arrest Shreedhar alias Sonya Vitthal Shelar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap NCP) यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला तसेच तडीपारीची कारवाई (Tadipar Action On Criminal In Pune) केल्यानंतर देखील शहरात फिरणार्‍या गुंडाला वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार Shreedhar alias Sonya Vitthal Shelar (35, रा. शांतनगर, वानवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. श्रीधर शेलार हा पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) आहे. त्याला पुणे शहर आणि जिल्हयातून तडीपार केलेले आहे. तडीपारीची कारवाई केल्यानंतर देखील तो वानवडी परिसरात फिरत होता. दरम्यान, त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

दारूच्या नशेत असताना वानवडी पोलिसांनी (Pune Police) त्याला सापळा रचुन अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीत घातक शस्त्रे आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहेत. त्याला दि. 9 जुलै 2021 रोजी तडीपार करण्यात आले होते.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त शाहूराव साळवे (ACP Shahurao Salve)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Pathare),
पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane) , पोलिस अंमलदार महेश गाढवे, अतुल गायकवाड,
हरिदास कदम, विठ्ठल चोरमले, राहुल गोसावी, अमोल गायकवाड आणि निळकंठ राठोड यांच्या पथकाने ही
कारवाई केली आहे.

Web Title : Pune Crime News | Threatening Kill To NCP City president Prashant Jagtap’s brother wanwadi Police
arrest Shreedhar alias Sonya Vitthal Shelar

Related Posts