Pune Crime News | येरवडा : घरी येण्यास उशीर झाल्याने 11 वर्षाच्या मुलाला मारहाण; उपाशी ठेवणार्या आत्या, आजीवर गुन्हा दाखल
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ढोल ताशा पथकाच्या सरावावरुन घरी येण्यास उशीर झाल्याने ११ वर्षाच्या मुलाला मारहाण (Beating) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) मुलाची आत्या व आजीवर बाल संरक्षण अधिनियमानुसार (Child Protection Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत पोलीस शिपाई विठ्ठल घुले (Police Constable Vitthal Ghule) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९३/२३) दिली आहे. हा प्रकार प्रकाशनगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई विठ्ठल घुले व त्यांचे सहकारी येरवड्यातील
प्रकाशनगरमध्ये गस्त घालत असताना दोघे जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी दोन महिला एका लहान मुलाला मारहाण करीत असल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलीस त्या महिलेच्या घरी गेले. त्यांनी विचारपूस केली. तेव्हा त्या दोन महिलांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करुन आमची कोणी तक्रार केली, त्याचे नाव सांगा, अशी विचारणा केली.
त्यावेळी घराच्या ड्रमजवळ एक मुलगा रडत होता. त्याला पोलिसांनी विचारल्यावर या ११ वर्षाच्या मुलाने सांगितले की,
तो ढोल ताशा पथकात वाजवण्यासाठी जातो. त्यामुळे घरी यायला उशीर झाला. म्हणून आत्या व आजीने पाईपाने मारहाण केली.
त्या नेहमी मारहाण करतात. उपाशी ठेवतात. त्याची आई त्यांच्यासोबत रहात नाही.
ती गेवराईला राहते़ पप्पा आईकडे जाऊ देत नाही, असे सांगितले. त्याच्या हातावर पाईपने मारलेले व्रण दिसून आले.
पोलिसांनी त्याच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार केले असून पोलीस उपनिरीक्षक शेलार (PSI Shelar)
तपास करीत आहेत.
- बदनामी करण्याची धमकी देऊन रिल्सस्टार करुन उकळली खंडणी; चोरीचे सोने घेऊन बनला गोल्डन बॉय, सोशल मिडियावर केली बदनामी
- हडपसर : वाद जागेचा, अत्याचार महिलांवर; घरात शिरुन बलात्कार करणार्यांना अटक, कारखाना मालकही जेरबंद
- विमान नगर : अल्पवयीन मुलींचा स्पोर्टस क्लासला विनयभंग करणार्या पीटी शिक्षकावर गुन्हा दाखल
Comments are closed.