IMPIMP

Pune Crime | पुण्यात पीएमपीएमएल चालकाला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध FIR

by nagesh
Pune Crime | PMPML driver brutally beaten in Pune; FIR against three

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | बस येथे का पार्क केली? अशी विचारणा करून तिघांनी PMPML चालकाशी (PMPML Driver) वाद घालून बेदम मारहाण (Beating) केली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून, उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime) गुरुवारी (दि.8) रात्री अकराच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील भगतवाडी, बहुली येथे घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत बसचालक सतीश संजय सोनवणे Satish Sanjay Sonwane (वय 34, रा. कळमशेत, पो. कोंढावळे, ता. मुळशी) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.9) तक्रार दिली आहे. या घटनेत सतीश उमप (Satish Ump) हेदेखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी अज्ञात तीन जणांवर आयपीसी 325, 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपीएमएल चालक असून, ते भगतवाडी येथे बस घेऊन गेले होते. भगतवाडी येथे यात्रा असल्याने त्यांनी बस पुढे जात नसल्याने एका ठिकाणी जागा मालकाची परवानगी घेऊन बस उभी केली होती. त्यानंतर फिर्यादी व सतीश उमप यांनी बसमध्ये जेवण केले. सशी सोनवणे यांनी बस सुरू करून लाइट लावली. त्यावेळी एक अनोळखी तरुण बसमध्ये आला. बस या ठिकाणी पार्क का केली? असे म्हणून फिर्यादी व उमप यांच्यासोबत वाद घातला. तसेच त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

 

त्यानंतर त्याने इतर दोन मुलांना बोलावून घेतले.
तिघांनी मिळून लाकडाने व लाथा बुक्क्यांनी फिर्यादी व उमपला मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी यांच्या कपाळावर टाके पडले असून, उजव्या डोळ्याच्या खालचे हाड फॅक्चर झाले आहे,
तर उमाप यांच्या डाव्या हाताला मार लागला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | PMPML driver brutally beaten in Pune; FIR against three

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्या मोदी येऊन आम्हाला टोमणे मारतील – उद्धव ठाकरे

Pune Crime | धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या युवतीवर बलात्कार; पुण्यातील कसबा पेठेतील घटना

Chandrakant Patil | औरंगाबादमध्ये चंद्रकांत पाटलांना ‘या’ संस्थेने दाखवले काळे झेंडे

Pune ATS | लष्कर-ए-तोयबाच्या दोन संशयितांना पुणे न्यायालयाकडून जामीन; पुणे एटीएसने केली होती अटक

 

Related Posts