IMPIMP

Pune Fire News | वानवडीतील आगीत चार घरे जळून खाक

by nagesh
Pune Fire News | Four houses were gutted in the fire in Wanavadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Fire News | वानवडी गावठाणातील शिवरकर चाळीमध्ये (Shivarkar Chali, Wanavadi) रात्री उशिरा
भीषण आग लागली. या आगीत ४ घरे जळून खाक झाली, तर तीन घरांना झळ पोहचली. अग्निशमन दलाने (Fire Brigade) ६ बंबांच्या मदतीने अर्धा
तासात ही आग आटोक्यात आणली. परंतु, तोपर्यंत या घराची राख रांगोळी झाली होती. (Pune Fire News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवरकर चाळीमध्ये ही पत्र्याची घरे होती. तेथील एका मांडवाचे सामान ठेवलेल्या खोलीमध्ये सर्वप्रथम रात्री साडेअकरा वाजता आग लागली. ती शेजारील घरात पसरत गेली. अग्निशमन दलाला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी या आगीची वर्दी मिळाली. त्याचवेळी प्रथम कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील वाहन आणि बुद्रुक येथील टँकर तातडीने रवाना झाले. (Pune Fire News)

पत्र्याचे बांधकाम असलेल्या घरांना आग लागल्याचे दिसून येताच जवानांनी पाण्याचा मारा करुन घरामध्ये कोणी अडकले नसल्याची खात्री केली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन आणखी ४ फायरगाड्या व २ वॉटर टँकर मागविण्यात आले. तसेच पुणे कँट्रोंमेंटची १ फायरगाडी घटनास्थळी आली. सुमारे २० मिनिटामध्ये आग आटोक्यात आणण्यात आली. रात्री साडेबारा वाजता आग पूर्णपणे विझविण्यात आली. या आगीमध्ये एका घरातील घरगुती सिलेंडर फुटला असून एकूण ४ घरे पूर्णपणे जळून खाक झाली. तर इतर ३ घरांना झळ लागली आहे. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे (Electric Short Circuit) लागल्याचा प्राथमिक अंदाज असून घरातील सर्व गृहपयोगी सामान जळून खाक झाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख (Sameer Sheikh), कैलास शिंदे (Kailas Shinde), वाहनचालक समीर तडवी, दिपक कचरे, संतोष गायकवाड तसेच जवान निलेश लोणकर, राहुल नलावडे, विशाल यादव, प्रकाश शेलार, जितेंद्र कुंभार, संदिप पवार यांनी सहभाग घेतला.

 

Web Title : Pune Fire News | Four houses were gutted in the fire in Wanavadi

 

हे देखील वाचा :

Bhaskar Jadhav | भाजप आकसापोटी विरोधकांवर करत आहे कारवाई – आ. भास्कर जाधव

Chitra Wagh | संजय राठोड प्रकरणावर आता पडदा टाकुयात – चित्रा वाघ

Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेन समोर नवीन अडथळा, गोदरेज कंपनीचे राज्य सरकार विरोधात प्रतिज्ञापत्रMumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेन समोर नवीन अडथळा, गोदरेज कंपनीचे राज्य सरकार विरोधात प्रतिज्ञापत्र

 

Related Posts