IMPIMP

Pune Metro | पद्मावती ते कात्रज दरम्यान मेट्रो स्टेशन करण्याची राष्ट्रवादीची मागणी

by nagesh
Pune Metro | NCP demands construction of metro station between Padmavati and Katraj

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मेट्रो मार्गाच्या (Pune Metro) प्रस्तावाला नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. परंतु, स्वारगेट (Swargate) ते कात्रज (Katraj) या मार्गात स्वारगेट-साईबाबा नगर (पद्मावती)-कात्रज हे मेट्रोचे तीनच स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गावर पद्मावती ते कात्रज दरम्यान स्टेशन नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ती दूर करण्यासाठी या दोन्ही स्टेशनच्या मध्ये बालाजी नगर (Balaji Nagar) किंवा भारती विद्यापीठ (bharati vidyapeeth) यापैकी एका ठिकाणी मेट्रो स्टेशन (Metro station) करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नगरसेवक (NCP corporator) विशाल तांबे (Vishal Tambe) यांनी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित (Dr. Brijesh Dixit) आणि खासदार सुप्रीया सुळे (MP Supriya Sule) यांना निवेदन दिले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दक्षिण पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो ही अत्यावश्यक बाब आहे.
ही मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी असताना मेट्रोसाठी स्वारगेट ते कात्रज जे स्टेशन बनविण्यात आले आहेत, त्यासाठी लावण्यात आलेले निकष काही प्रमाणात चुकीचे आहेत.
दिल्लीतील (Delhi Metro) यशस्वी मेट्रोमार्गाचे स्टेशन पाहिल्यास साधारणपणे एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर एक स्टेशन करण्यात आले आहे.
त्यामुळे, प्रवाशांची सोय होत असून, मेट्रोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
परंतु, पुण्यात मात्र स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाचे स्टेशन पाहता,
ते प्रवाशांच्या सोयीने अडचणीचे ठरणार असल्याने त्यास कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला आहे.

 

आज धनकवडी, बालाजी नगर, भारती विद्यापीठ परिसर, चैतन्यनगर, आंबेगाव पठार हा परिसर दाट लोकवस्तीचा असून 2-3 लाख नागरिक या परिसरात रहात आहेत.
तसेच या परिसरात शासकिय व निमशासकिय आस्थापना आणि भारती विद्यापीठ पीआयसीटी यासारख्या शिक्षणसंस्था या परिसरात कार्यरत आहेत.
त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, कामगार, नोकरवर्ग आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला (Rajiv Gandhi Zoo) भेट देणारे पर्यटक यांचा विचार करता जवळपास एक लाखाहून अधिक प्रवासी या परिसरात रोज ये-जा करीत असतात.

परंतु, सध्या मार्गावरील जे स्टेशन प्रस्तावित आहेत, त्यामध्ये साईबाबा नगर (पद्मावती) नंतर थेट कात्रज स्टेशन देण्यात आले आहे.
या दोन्ही स्टेशनमधील अंतर साधारणपणे दोन किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
मेट्रो ही प्रवाशांच्या सोयीसाठी, वेळ वाचविण्यासाठी असताना एका स्टेशनवर उतरून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिकांना पुन्हा पायपीट करावी लागणार आहे.

त्यामुळे, मेट्रो सेवा (Pune Metro) सुरू करण्याचा नेमका उद्देश साध्य होणार का, असा प्रश्न आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

त्यामुळे, या सर्व स्टेशनचा आढावा घेऊन बालाजी नगर किंवा भारती विद्यापीठ येथे स्टेशन होणे ही नागरिकांच्या सोयीचे व गरजेचे आहे.
या ठिकाणी स्टेशन झाल्यास धनकवडी (Dhankawadi) व बिबवेवाडीला (Bibwewadi) जाणारा समांतर रस्ता जोडला जाईल.
त्यामुळे बिबवेवाडीतील नागरिकांनाही थेट या स्टेशनवरून मेट्रोचा प्रवास करता येणे सहज शक्य होणार आहे.

कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे यश-अपयश हे प्रवाशांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, त्यावर अवलंबून असते.
त्यामुळे, मेट्रोच्या स्टेशनबाबत निर्णय घेताना ही वाहतूक व्यवस्था प्रवाशांच्या अधिक सोयीची कशी होईल, याचा विचार होण्याची गरज आहे. या आराखड्यात अद्याप बदल होणे शक्य असल्याचे तांबे यांनी निवदेनात म्हटले आहे.

त्यामुळे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर नवीन प्रस्तावित भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर स्टेशनचा अंर्तभाव डिपीआर (DPR) मध्ये करावा.
ही सर्व धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार परिसर येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.
भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर या मेट्रो स्टेशनचा अंर्तभाव महामेट्रोने स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाच्या सुधारीत डिपीआर मध्ये करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात महामेट्रोचे मुख्य अधिकारी अतुल गाडगीळ (Atul Gadgil) यांनी नागरिकांच्या दृष्टीने मागणी योग्यच असून याचा नक्कीच विचार करण्यात येईल, असे अश्वासन दिल्याचे विशाल तांबे (ncp corporator vishal tambe) यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Metro | NCP demands construction of metro station between Padmavati and Katraj

 

हे देखील वाचा :

Pune Court | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात 13 पुरावे न्यायालयात सादर; आरोपींच्या वकिलांनी केली ‘ही’ मागणी

Pravin Darekar | प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल, म्हणाले-‘मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा, मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा, नेमकं काय करणार आहात?

Post Office Schemes Provide Loan | पोस्ट ऑफिसच्या कोण-कोणत्या योजनांवर मिळते कर्जाची सुविधा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 

Related Posts