IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना

by sachinsitapure
Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झालेल्या 32 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार (Pune Rape Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2023 या कालावधीत कात्रज, गोवा (Goa) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत 32 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन समित उमेश सोनवणे Samit Umesh Sonwane (वय-31) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, समित आणि पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. चॅटींग करत असताना त्यांचे सूत जुळले. आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला अविवाहित असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कात्रज येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच गोवा येथे फिरण्यास नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता समित याने
लग्न करण्यास टाळाटाळ करुन अद्यापर्यंत लग्न केले नाही,
असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts