IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | अश्लील बोलून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, एनडीए रोडवरील घटना

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील एनडीए रोडवर (NDA Road) एका तरुणीला भररस्त्यात मिठी मागून तिच्या सोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. हा गुरुवारी (दि4) रात्री पावणे नऊच्या सुमारास दामिनी बार समोरील सार्वजनिक रोडवर घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत रामनगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अशोक मुन्नर कुशवाह (वय-31 रा. अमर भारत सोसायटी, वारजे) याच्यावर आयपीसी 354(अ), 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एनडीए रोडवरील दामिनी बार समोरील सार्वजनिक रोडवर
भावाच्या दुचाकीजवळ उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी अशोक कुशवाह हा अचानक पाठीमागून आला.
त्याने पीडित तरुणीला मिठी मारली. याचा जाब विचारला असता आरोपीने तरुणीला डोळा मारून तिच्यासोबत अश्लील
बोलून तिचा विनयभंग केला. पुढील तपास महिला पोलीस हवालदार राजगुरु करीत आहेत.

Related Posts