IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | IPL क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक; आरोपींमध्ये बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याची चर्चा

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Three booked for betting on IPL cricket match, one arrested; There is talk that the accused include the son of a big political leader

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | सध्या आयपीएल टी-20 (IPL-2023) चे सामने सुरु असून या सामन्यांवर
सट्टा (Online Bet On IPL Cricket Match) घेणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी (दि.12) राजस्थान रॉयल्स (Rajasthan
Royals) आणि चेन्नई सुपर किंग  (Chennai Super King) या दोन संघामध्ये सामना झाला. या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एकाला पिंपरी पोलिसांनी
(Pimpri Police) अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. फरार असलेल्या आरोपींमध्ये पिंपरी चिंचवडमधील एका बड्या राजकीय पुढाऱ्याच्या (Political Leader) मुलाचा समावेश असल्याची चर्चा आहे. ही कारवाई (Pune Pimpri Chinchwad Crime) पिंपरी मार्केट परिसरात बुधवारी करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोशन जितेंद्र मायारामानी Roshan Jitendra Mayaramani (वय-27 रा. कान्हा विहार बिल्डिंग, साई चौक, पिंपरी) याला अटक (Arrest) केली आहे. तर सनि सुखेजा Sunny Sukheja (वय-35 रा. पिंपरी) आणि आशु आसवानी Ashu Aswani (वय-35 रा. पिंपरी) हे दोघे फरार झाले आहेत. आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Maharashtra Prevention of Gambling Act), इंडियन टेलिग्राफ अॅक्ट (Indian Telegraph Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई विकास जनार्दन रेड्डी यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग या सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेतली जात असल्याची माहिती पोलीस अंमलदार रेड्डी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपरी मार्केट (Pimpri Market) परीसरात बेटींग घेणाऱ्याचा शोध घेत असताना आरोपी रोशन मायारामानी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो त्याचा मोबाईल फोनवर चालु क्रिकेट सामन्यादरम्यान ग्राहकांना फोन करुन त्याच्या फोनमध्ये असलेल्या ‘क्रिकेट माझा 11’ या अॅपवरुन बेटींगचे भाव ग्राहकांना सांगत होता.

 

तसेच ग्राहकांनी बेटींग लावल्यावर ते पुढे त्याचा मालक सनी सुखेजा आणि आशु आसवानी यांना कळवत होता.
सनी सुखेजा आणि आशु आसवानी हे दोघे ग्राहकांच्या रक्कमेतून बेटिंग लावत असल्याची माहिती आरोपीने दिली.
त्यानुसार पोलिसांनी सुखेजा आणि आसवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
फरार आरोपींमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचा मुलगा असल्याची चर्चा सुरु आहे.
पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक अनिरुद्ध सावर्डे (PSI Anirudh Savarde) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey), पोलीस सह आयुक्त मनोजकुमार लोहिया ((IPS Manoj Kumar Lohia), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (IPS Dr. Sanjay Shinde), परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil), सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे (ACP Prerna Katte), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे (Sr PI Shankar Awatade), पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ (PI Bhojraj Misal) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, पोलीस अंमलदार भांडवलकर, बारशिंगे, हांडे, करपे, बागसिराज, भारती, महाडिक, शेख, जानराव, रेड्डी यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Three booked for betting on IPL cricket match, one arrested; There is talk that the accused include the son of a big political leader

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पर्वती : अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी, 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा

Prakash Ambedkar | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, प्रकाश आंबेडकर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Maharashtra Political News | मविआ सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद का दिले? जयंत पाटलांचा खुलासा म्हणाले-‘राजकारणात काही गोष्टी…’

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

 

Related Posts