IMPIMP

Pune Traffic Police | पुणे शहरात आता मध्यरात्रीपर्यंत ‘सिग्नल’ सुरू राहणार

by nagesh
Pune Traffic Police | signal will be on till midnight in pune city now traffic police decision cp amitabh gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Traffic Police | पुणे शहरातील प्रमुख रस्त्यावर मध्यरात्रीही वाहतूककोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी वाहतूक पोलिसांना (Pune Traffic Police) मध्यरात्री 2 पर्यंत वाहतूक नियमनाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना आता रात्रपाळीत काम करावे लागणार आहे. शहरात (Pune Police) आता मध्यरात्रीपर्यंत सिग्नल ऑन (Signal On) राहणार आहे. त्यामुळे बेजबाबदार वाहनचालकांना आता ‘ब्रेक’ लागणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रात्री 9 नंतर वाहतूक पोलिसांची ड्यूटी संपली आणि सिग्नल यंत्रणा बंद झाली की वाहनचालक सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अशा वाहनचालकांवर आता सिग्नल आणि वाहतूक पोलिसांची नजर मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांना 3 पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम विभागून देण्यात येणार आहे. (Pune Traffic Police)

 

नव्या नियमानुसार, कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, जंगली महाराज रस्ता, बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्ता, स्वारगेट, मार्केट यार्ड, हडपसर, कोथरूड भागातील प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. या विभागातील वाहतूक पोलिसांना मध्यरात्रीपर्यंत वाहतूक नियोजनाचे काम करावे लागणार आहे. त्याचबरोबर या भागातील सिग्नल यंत्रणा (Signal System) मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. किरकोळ अथवा गंभीर अपघात झाल्यास रात्रपाळीत नियुक्तीस असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, “शहरातील प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असल्याने
वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये वाहतूक नियोजनाचे काम विभागून देण्यात येणार आहे.
त्यानुसार वाहतूक विभागाने पोलिसांच्या कामाचे नियोजन केले आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Traffic Police | signal will be on till midnight in pune city now traffic police decision cp amitabh gupta

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Rains | राज्यात ढगाळ वातावरण ! आगामी 5 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस?

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts