IMPIMP

Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat | राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले; राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

by nagesh
Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat | Lost the people-oriented leadership that fostered friendship in politics; Tribute to Radhakrishna Vikhe Patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat | “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. (Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

 

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता.
पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते.
त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व
काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

 

Web Title :- Radhakrishna Vikhe Patil On Girish Bapat | Lost the people-oriented leadership that fostered friendship in politics; Tribute to Radhakrishna Vikhe Patil

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Pune Crime News | पुण्यात भरदिवसा व्यापार्‍याकडील रोकड लुटणार्‍या 2 मुख्य आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडून अटक

Dr Neelam Gorhe On Girish Bapat | गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

 

Related Posts