IMPIMP

Rain in Maharashtra | परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, पुण्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण तर ‘या’ भागात पाऊस

by nagesh
Rain in Maharashtra | journey back to monsoon from the state was long rain updates

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  तामिळनाडू (Tamil Nadu) ते राजस्थान (Rajasthan) या दरम्यान तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे महाराष्ट्रात मान्सून (Rain in Maharashtra) सक्रिय आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस (Moderate Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तसेच पुण्यात (Pune Rain) पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे तर दोन दिवस विदर्भात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. साधारण 15 ऑक्टोबर नंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातून मान्सूनचा (Rain in Maharashtra) परतीचा प्रवास सुरु होईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

द्रोणीय स्थिती तयार झाल्याने राज्यात सर्वत्र पाऊस (Rain in Maharashtra) पडत आहे. कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) पुढील तीन दिवस मान्सून (Monsoon) सक्रिय राहील, अशी शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी (Dr. Anupam Kashyapi) यांनी दिली. 13-14 तारखेनंतर मात्र आर्द्रतेचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे पाऊस कमी होईल, तर साधारण 15 ऑक्टोबरनंतर मान्सूनचा पुढील प्रवास सुरु होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागातून हा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता असल्याचे काश्यपी यांनी सांगितले.

 

 

पुण्यात ढगाळ वातावरण

पुण्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तर सायंकाळी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह एक ते दोन जोरदार सरी कोसळण्याची शक्यात आहे.
दरम्यान सोमवारी दुपारी पुणे शहराला जोरदार पावसाने झोडपले.
मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ असले तरी पाऊस नव्हता.
मात्र सोमवारी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rain in Maharashtra | journey back to monsoon from the state was long rain updates

 

हे देखील वाचा :

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून मारहाण; तरुणाला अटक

Andheri East By-Election | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापलं, भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर

Shinde Group | पहिले पर्याय रद्द झाल्याने शिंदे गटाने पुन्हा पाठवली ही 3 चिन्ह, निवडणूक आयोगाला अखेरच्या क्षणी केला ई-मेल

 

Related Posts