IMPIMP

Rainfall Alert | येत्या काही तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार सरी, हवामान खात्याचा इशारा

by nagesh
Maharashtra Rains Update | weather report vidarbha gadchiroli konkan marathawada maharashtra rain updates

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनRainfall Alert | सध्या उत्तर भारतातील (North India) अनेक राज्यांतून थंडी (Cold) गायब झाली आहे. थंडी गायब होताच वातावरणात (Atmosphere) मोठे बदल जाणवू लागले आहेत. काल दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यामध्ये वेगवान वाऱ्यासह (Strong Wind) पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट (Hailstorm) झाली आहे. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी वादळी वाऱ्यासह (Gusty wind) हलका (Light) ते मध्य स्वरुपाचा पाऊस (Moderate Rainfall) सुरु होता. आज पुन्हा दिल्लीसह उत्तरेतील काही भागात हवामान खात्यानं (IMD) पावसाचा अंदाज (Rainfall Alert) वर्तवला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आज सकाळपासूनच दिल्लीसह (Delhi) गाझियाबाद (Ghaziabad), नोएडा (Noida) आणि हरियाणाच्या (Haryana) अनेक भागांत ढगाळ हवामानाची नोंद झाली. पुढील काही तासांत या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच 28 फेब्रुवारीपासून उत्तर – पश्चिम भारतात विजांच्या कडकडाटासह (Lightning Strikes) वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. 3 मार्चपर्यंत हीच स्थिती कायम (Rainfall Alert) राहणार आहे.

 

महाराष्ट्रात कोरडे हवामान
महाराष्ट्रात (Maharashtra) मागील दोन आठवड्यापासून कोरड्या हवामानाची (Dry weather) नोंद करण्यात आली आहे. याच काळात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ – उतार जाणवले आहेत. गेल्या दोन दिवसांत पुण्यासह (Pune) राज्यातील अनेक भागात किमान तापमानात (Minimum Temperature) 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. आज पुण्यात यंदा प्रथमच किमान तापमानाचा पारा 22 अंशावर गेला आहे. वडगाव शेरी (Wadgaon Sheri) याठिकाणी आज 22.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
पुणे 14.5, बारामती 16.3, रायगड (Raigad) 20.9, रत्नागिरी 20.2, जळगाव (Jalgaon) 13.3, जेऊर 16, अहमदनगर 14.8,
महाबळेश्वर (Mahabaleshwar) 16.6, सातारा (Satara)17.4, उस्मानाबाद (Osmanabad) 16.8, कोल्हापूर (Kolhapur) 20.5,
सोलापूर (Solapur) 21.6, कुलाबा (Colaba) 20.6, सांताक्रूझ (Santa Cruz) 18.8, ठाणे (Thane) 19, परभणी 20.5, औरंगाबाद (Aurangabad) 16.5, माथेरान (Matheran) 18.8 आणि डहाणू येथे 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Rainfall Alert | rainfall alert in many places know latest weather in maharashtra

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Shamita Shetty Viral Video | शमिता शेट्टीवर का आली अशी वेळ, सर्वांनी केलं दुर्लक्ष; पाहा व्हायरल व्हिडिओ

Amruta Fadnavis | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख

 

Related Posts