IMPIMP

Ration | रेशन कार्डवाल्यांना मोफत धान्यासह आता Free मिळेल ‘डाळ’, ‘तेल’ आणि ‘मीठ’ ! जाणून घ्या सरकारचा प्लान

by nagesh
Ration Card Rule

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Ration | उत्तर प्रदेशच्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना खुशखबर मिळू शकते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2022 पर्यंत फ्री रेशनची घोषणा करू शकतात. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने योगी सराकर अनेक मोठ्या घोषणा करत आहे. याच पार्श्वभूमीवर योगी सरकार (Yogi Government) मोफत रेशन योजना पुढील वर्षी मार्चपर्यंत वाढवण्याचा विचार करत (Ration) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुढील वर्षापर्यंत मिळू शकते मोफत रेशन

 

मीडिया रिपोर्टनुसार, योगी सरकार सध्याच्या केंद्रीय अन्न वितरण कार्यक्रम ‘पीएम गरीब कल्याण अन्न योजना’ पुढे वाढवून मार्चपर्यंत मोफत धान्य देण्याचा विचार करत आहे.
ही योजना कोविड काळात सुरू केली होती. यापूर्वी पीएम मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार ही योजना नोव्हेंबर पर्यंत चालवली जाणार आहे.
परंतु आता उत्तर प्रदेशात योजना पुढील वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते.

 

रेशन योजनेचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतूक

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदारांसोबत आणि विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकांमध्ये मोफत रेशन (Ration) वाटपाच्या या योजनेचे कौतूक केले आहे.
सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी फीडबॅकवर ताबडतोब प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु यानंतर आपल्या टीमसोबत यावर चर्चा करून एक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जातात.
परंतु, राज्य सरकार यामध्ये 1 किलो डाळ, 1 लीटर तेल आणि 1 पॅकेट मीठाचा समावेश करण्याची योजना बनवत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Ration | ration cards holders will get free ration till march 2022 along with pulses oil and salt know govt new plan

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis New Song | दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू निगम ही सोबत गाणार

Chandrakant Patil | … म्हणूनच मोठे पवार मैदानात उतरले – चंद्रकांत पाटील

Maharashtra Covid Vaccination | महाराष्ट्राने केला विक्रम; 3 कोटी लोकांचे पूर्ण लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य

 

Related Posts