IMPIMP

Ratnagiri News | सॅल्यूट ! डेपो व्यपस्थापकांनी 7.5 लाखांची रोकड घेऊन ST च्या टपावर काढले तब्बल 10 तास

by nagesh
Ratnagiri News | bus depot manager camps top bus 10 hours guard government money amid floods

रत्नागिरी न्यूज (Ratnagiri News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  Ratnagiri News । राज्यात पावसाची दाणादाण होत आहे. यामुळे सर्वत्र जलमय वातावरण झालं आहे. अनेक ठिकाणी पूर आला आहे. वाहतुकीची कोंडी झाली आहे. अशातच अनेक नागरिक आपली वस्तू आपण, कसे पाण्यापासून बचावले जाईल. याकडे लक्ष देत असतात. मात्र, एका एसटी आगार व्यवस्थापकाने (Ratnagiri News) आपली कर्तव्य दक्षता निभावली आहे. पाण्यामुळे संगणकाचे नुकसान होऊ नये, यासाठी ते काढून एका ST मध्ये चिपळूणचे (Chiplun) आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के (Depot Manager Ranjit Rajeshirke) यांनी तब्बल साडेसात लाखाची रोकड सुरक्षित ठेवली आहे. तर 10 कर्मचाऱ्यांना घेऊन चक्क ST च्या टपाचा आधार घेतला. पाण्याचा वेढा वाढल्याने साडेसात लाखाची रक्कम बरोबर घेतली. तब्बल दहा तास तेथेच अडकून राहिले होते. या कार्यामुळे राजेशिर्के यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के (Depot Manager Ranjit Rajeshirke) हे तब्बल पहाटे 5 ते
दुपारी 3 वाजेपर्यंत टपावर अडकले होते. नंतर NDRF च्या पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. ST ची रक्कम तसेच सहकारी कर्मचारी यांना वाचवण्यासाठी त्यांनी धाडस दाखवली आहे. गुरूवारी पहाटे बस स्थानकात (Bus station) पाणी येत असल्याचे आगार व्यवस्थापक राजेशिर्के यांना समजताच त्यांनी रोकड विभागात धाव घेतली. साडेसात लाखाची रक्कम काढून सुरक्षित ठेवली. संगणक काढून एका ST मध्ये सुरक्षित ठेवले. परंतु, पाणी वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी रक्कम पोटाशी गच्च धरून ठेवली. स्वत:बरोबर इतर 10 कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी ST च्या टपाचा आधार घेतला आहे.

 

 

या दरम्यान, पाणी ST च्या चारही दिशेने वाढत होते.
ST पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे पहाटे 5 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ST च्या टपावर अडकून बसले होते.
मदतीला कोण धावून येईल एवढीच फक्त चाहूल होती.
नंतर शेवटी दुपारी 3 वाजता NDRF च्या पथकाने रणजित राजेशिर्के आणि इतर 10 कर्मचाऱ्यांची सुटका केली.
तसेच, बाहेर येत असताना काही प्रमाणात रोकड पाण्यामुळे भिजली गेली.
मात्र, राजेशिर्के यांच्या धाडसी निर्णयामुळे ST ची रक्कम बचावली आहे.

 

 

Web Title :-Ratnagiri News | bus depot manager camps top bus 10 hours guard government money amid floods

 

हे देखील वाचा :

New Rules Salary | 1 ऑगस्टपासून सॅलरी संबंधीचे बदलतील ‘हे’ नियम, आता सुट्टीच्या दिवशी सुद्धा अकाऊंटमध्ये येईल पगार

Fake website | बनावट ‘website’ कशी ओळखणार?, मुंबई पोलिसांनी दिले 4 महत्त्वाचे पॉइंट, जाणून घ्या

Mumbai News | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं कोरोनाने निधन

 

Related Posts