IMPIMP

Rohit Pawar | सत्यजीत तांबेंच्या भाजपसोबत झालेल्या बैठकीत राम शिंदे मध्यस्थं; वृत्तावर पहिल्यांदाच बोलले रोहित पवार, म्हणाले…

by nagesh
Rohit Pawar | rohit pawar reaction on satyajeet tambe nashik graduate constituency election ram shinde and iqubal singh chahal ed notice

अहमदनगर  : सरकारसत्ता ऑनलाईन  Rohit Pawar | नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता-पुत्राकडून काँग्रेस पक्षाचा विश्वासघात करण्यात आलेल्या कारवाईत काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. नाशिकच्या या घडलेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘ काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत विषय आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला नाही याबाबत बसून चर्चा करून तो विषय संपवायला पाहिजे होता. पण तो संपला नाही. मात्र यावरून मतभेद खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्रित बसून या सर्व प्रकाराला एका निर्णायक पातळीवर नेण्याची गरज आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी यात लक्ष घालून काँग्रेसला थोडसं सांगून यात काही मार्ग निघतोय का? हे बघायला पाहिजे.’ असही यावेळी बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच तांबे पिता-पुत्रांबरोबर भाजपची बैठक घडवून आणण्यासाठी राम शिंदे यांनी मध्यस्थी केल्याच्या वृत्तावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे हे दोघेही सक्षम आहेत. त्या ठिकाणी बैठक करण्यासाठी जर कोणी त्यांना मदत केली असेल तर त्यांनाच याबद्दल विचारायला हवं. असं देखील यावेळी बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

 

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार असताना कोविड काळात राज्यातील मुंबई महापालिकेत मोठा आर्थिक
गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर करण्यात आला आहे.
तसेच त्यांना ईडीचे नोटीस प्राप्त झाले असून त्यात त्यांना आज दि.१६ ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की.
‘कोरोना काळामध्ये चहल यांनी खूप मोठे काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले होते.
मात्र शिवसेनेने मुंबईत केलेले काम महापालिका निवडणुकीत भाजपाला कदाचित अडचणीत आणू शकते त्यामुळेच
गोंधळात गोंधळ करण्याचा कदाचित हा प्रयत्न असेल असं वाटतं.
एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने अडचणीत आणणं हे योग्य नाही.’ असे मत रोहित पवार यांनी
यावेळी बोलताना व्यक्त केले. (Rohit Pawar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नुकतच शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी बोलताना, जसे ‘आप’ने आपले गेलेले आमदार परत आणले,
तसे शिवसेनेलाही आणता आले असते. असे वक्तव्य केले होते. त्यावर रोहित पवारांना विचारले असता,
‘थोडे दिवसातच बघा काय होते ते’. असे सूचक विधान त्यांनी यावर बोलताना केले. (Rohit Pawar)

 

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar reaction on satyajeet tambe nashik graduate constituency election ram shinde and iqubal singh chahal ed notice

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ठाकरे गटाची वाढणार चिंता! तीस-तीस घोटाळ्यात ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे नाव

Pune Crime News | पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील योगेश जगधने व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर

 

Related Posts