IMPIMP

Rupali Chakankar | वाईन विक्रीचं धोरण आर्थिकदृष्ट्या योग्य, रुपाली चाकणकर यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे समर्थन

by nagesh
Rupali Chakankar | what happened when the government changed i will not leave the post of chairperson of the womens commission said rupali chakankar clearly

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) वाईन (Wine) विक्रीला परवानगी (Permission) दिल्यानंतर या निर्णयाला विरोध केला जात आहे. असे असतानाच राज्याच्या महिला आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. राज्य सरकारचे वाईन विक्रीचं धोरण हे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे, आणि अद्यापही महिला आयोगाकडे यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच अशा प्रकारे वाईन विक्री करु नये, अशी मागणी देखील आयोगाकडे आली नसल्याचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जन सुनावणी घेण्यासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) आल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

कोरोना काळात बालविवाह वाढले
चाकणकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहाचे (Child Marriage) प्रमाण वाढले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) 1 हजारापेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. जळगावमध्ये 40 बालविवाह रोखण्यात आले. परंतु राज्यात अनेक ठिकाणी बालविवाहाची संख्या खूपच जास्त आहे. बालविवाहांच्या अशा घटनांमुळे महाराष्ट्र 20 ते 25 वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे कुठेही बालविवाह होत असेल तर त्याला उपस्थित राहणारे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करावे, तसेच नोंदणी अधिकारी चुकीचे जास्त वय नोंदवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महिला आयोगाने मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

महिलांसाठी तक्रार निवारण समिती पाहिजे, अन्यथा…
शासकीय (Government) आणि निमशासकीय (Semi-Government) कार्यालयामध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती (Complaint Redressal Committee) असावी, ज्या कार्यालयांमध्ये ही समिती नाही, त्या कार्यालयांना 50 हजार रुपये दंड आणि कंपनीची नोंदणी तात्काळ रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही समिती नसेल, तर लैंगिक अत्याचारापासून (Sexual Harassment) महिलांना संरक्षण मिळत नाही, असेही त्या म्हणाल्या.
शक्ती विधेयक (Shakti Bill) लवकरच कायद्यात रुपांतरित होईल, याबाबत सर्वपक्षीय एकत्र आले आहेत.
महिलांवर अनेकदा राजकीय पुढारी टिपणी करतात. ही टिपणी करु नये असेही चाकणकर यांनी सांगितले.

 

अमृता फडणवीस यांचा राजकीय द्वेष
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यावर टीका करताना चाकणकर म्हणाल्या, अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रहदारी (Mumbai Traffic) संदर्भात जी काही वक्तव्ये केली आहेत.
त्यात त्यांचा राजकीय द्वेष दिसून येतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण कुठं आणि कसं व्यक्त व्हावं, हे महत्त्वाचं आहे.
आपल्या विचारांतून संस्कार आणि संस्कृती दिसते, ते महाराष्ट्र पाहतोय, असे चाकणकर यांनी म्हटले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किरीट सोमय्या यांच्यावर टीका
भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुण्यात धक्काबुक्की करण्यात आली.
यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, चर्चेत राहणे हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे.
त्यांना दुसरे फार काही माहिती नाही. त्यांच्या प्रवक्त्यांना एक स्क्रीप्ट दिली जाते, त्यानुसार ते बोलत राहतात.

 

Web Title :- Rupali Chakankar | maharashtra state women s commission president rupali chakankars support to the Maha Vikas Aghadi Government decision to sell wine said

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील 12 जणांना जामीन मंजूर

Digital News Publishers-Accreditation | डिजिटल वृत्त संस्थामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना मिळणार अधिस्वीकृती

Maharashtra Police | दिंडीतील वारकऱ्याचा खून प्रकरणात पोलीस कर्मचारी दत्तात्रय भोसले याला जन्मठेप; सहाय्यक पोलिस आयुक्तांसह यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या

 

Related Posts