IMPIMP

Sai Resort Case | साई रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना अटक

by nagesh
Sai Resort Case | dapoli police has arrested the former sdo jairam deshpande in the sai resort case

दापोली : सरकारसत्ता ऑनलाईन – Jairam Deshpande Arrested | रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील (Dapoli Murud Beach) वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील (Sai Resort Case) संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे (Jairam Deshpande) यांना ईडीच्या (ED) ताब्यातून दापोली पोलिसांनी अटक (Dapoli Police) केली आहे. न्यायालयाने त्यांना 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) उद्योजक सदानंद कदम (Sadanand Kadam) हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत (ED Judicial Custody) आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात गाजलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) आता दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer) जयराम देशपांडे यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. त्यांना गुरुवारी (दि.30) न्यायालयासमोर हजर केले असता 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सध्या देशपांडे यांना दापोलीच्या सब जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. नियम धाब्यावर बसवून साई रिसॉर्टला बिनशर्त परवानगी दिल्याचा ठपका देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रूपा दिघे (Rupa Dighe) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल परब (Anil Parab), सुरेश तुपे (Suresh Tupe) व अनंत कोळी (Anant Koli) यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात (Dapoli Police Station) 8 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून 19 नोव्हेंबर 22 रोजी अटकपूर्व जामीन घेतला होता.

 

त्यानंतर याच प्रकरणात मंडल अधिकारी सुधीर पारदुले (Divisional Officer Sudhir Pardule) यांना अटक करण्यात आली होती.
मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
तर तत्कालीन प्रांतअधिकारी देशपांडे यांना दापोली पोलिसांनी ईडी कोठडीतून या गुन्ह्यात वर्ग करुन घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे (PI Vivek Ahire) करीत आहेत.
सध्या जयराम देशपांडे यांना शासनाने निलंबित केले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
त्यामुळे या वादग्रस्त प्रकरणात आणखी कोणा कोणाला ईडी अथवा पोलिसांकडून अटक होते हे पहावे लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sai Resort Case | dapoli police has arrested the former sdo jairam deshpande in the sai resort case

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | अजित पवारांनंतर सुप्रिया सुळेंनी वडेट्टीवारांना सुनावलं, म्हणाल्या – ‘इतक असंवेदनशील…’ (व्हिडिओ)

Pune PMC Property Tax | 40 टक्के कर सवलतीचा निर्णय मंत्री मंडळापुढे प्रलंबित ! 2023-24 या आर्थीक वर्षाची बिलांचे 1 मे नंतर वाटप

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 संपन्न

 

Related Posts