IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच, यंदाची दिवाळी तुरुंगातच

by nagesh
Sanjay Raut | court once again denied bail to shivsena mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. शुक्रवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने पुढील तारीख दिली आहे. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कथित गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणात राऊतांना ऑगस्ट महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावली गेली. राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) आहेत. राऊतांनी जामीनासाठी अर्ज देखील केला होता. पण त्यांच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख पडत आहे. आज राऊतांची जामीन अर्जावरील आणि नियमित सुनावणी पीएमएलए (PMLA) न्यायालयात एकाच वेळी झाली.

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयात नेताना आणि आणताना ते माध्यमांसोबत संवाद साधतात. त्यामुळे आज पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. त्यांना माध्यमांसोबत संवाद साधण्यास मनाई करण्यात आली, तसेच पत्रकारांना देखील त्यांच्यापासून लांब ठेवण्यात आले. आजच्या सुनावणीत संजय राऊत माध्यमांसोबत बोलत असल्याची तक्रार पोलिसांनी न्यायाधीशांकडे केली. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांचे कान उपटले. तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हीच म्हणता की हे राजकीय प्रकरण नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते बोलू शकतात. ईडीला देखील काहीच अडचण नाही, असे न्यायाधीशांनी म्हंटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patrachal Scam) संजय राऊत आणि त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहेत.
प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनी गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला असून त्यातून कोट्यावधी रुपये लांबवले.
यातील काही पैसे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर देखील टाकले होते.
संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यावर 55 लाख रुपये आले होते.
त्यामुळे राऊत यांना अटक करण्यात आली होती.

 

 

Web Title :-  Sanjay Raut | court once again denied bail to shivsena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच, CBI न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

MP Navneet Rana | बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा अडचणीत, अटक होणार?

India vs Pakistan | भारत- पाक सामन्यापूर्वी हा खेळाडू झाला जखमी, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

 

Related Posts