IMPIMP

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही’ ! राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या डेडलाईनवर संजय राऊतांचा पलटवार

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut taunts raj thackeray said hi stone inlaid with shendur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) 1 मे ला औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेतही भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहिले. राज ठाकरेंनी ठाण्यातील (Thane) उत्तरसभेमध्ये 3 मे चा अल्टिमेटम दिला होता तो आता 4 मे चा दिला आहे. मशिदीवरील (Mosque) भोंगे (Loudspeakers) हटवले नाहीत तर मशिदीसमोरच हनुमान चालिसा लावा, असं आवाहन राज्यातील नाहीतर देशातील हिंदूंना केलं आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut on Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही, महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही. गृहमंत्री असून लोकनियुक्त सरकार आहे. त्यामुळे काय करायचं त्यांना माहित आहे, असं सूचक वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut on Raj Thackeray) यांनी केलं आहे. अजान भोंगे हे कायद्याचा विषय असतील त्यामुळे पोलीस (Police) आणि कोर्ट (Court) काय म्हणतं त्यापद्धतीने काम होईल. त्यामुळे तुम्हाला काहीच काम नसेल तर देशाचं आणि राज्याचं वातावरण खराब करत आहात, असंही राऊत म्हणाले.

 

स्वत:च्या हितासाठी हे राजकीय हिताचं नसून हे राष्ट्राला आणि एकात्मतेला मारक आहे.
आम्ही त्याविरोधात लढलो असून संघर्ष केला आहे. त्यानंतर कोर्टाने काही निर्णय दिले आहेत.
देशात कायद्याचं राज्य आहे त्यामुळे प्रत्येकाने कायद्याचं पालन केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. यावेळी बोलताना राऊतांनी बाबरी मशिदीच्या (Babri Masjid) मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) निशाणा साधला.

 

दरम्यान, सीबीआयने तपास (CBI Investigation) केला असून केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा.
हे अज्ञानी लोक आहेत त्यांनी ती पानं वाचली तर शिवसेना (Shivsena) कुठं आहे हे त्यांना समजेल.
तो विषय आता संपला आहे मात्र इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला काय झालं ?, राम मंदिर आता उभं राहत असून आता वातावरण बदललं असल्याचं राऊतांनी सांगितलं.

 

Web Title :- Sanjay Raut On Raj Thackeray | shivsena mp and leader sanjay raut warn mns chief raj thackeray over loudspeaker ban

 

हे देखील वाचा :

Supreme Court | कोरोना लसीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, ‘कोरोनाची लस घेण्यासाठी…’

Tata IPL 2022 Dhoni | महेंद्र सिंह धोनी 2022 आयपीएलनंतर होणार निवृत्त ?; स्वत: धोनीने केला खुलासा

Rupali Patil On Devendra Fadnavis | ‘बाबरी पाडली त्यावेळी फडणवीसांचे वय काय होते ?’ रुपाली पाटील यांचा खोचक सवाल

 

Related Posts