IMPIMP

Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांना अधिकार नाही,’ या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले…

by nagesh
Sanjay Shirsat | sanjay shirsat statement after aditya thackeray criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Sanjay Shirsat | आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांची ९७ वी जयंती आहे. मात्र, त्यावरून देखील शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करण्याचा आम्हाला अधिकार नाही.’ असे म्हणणाऱ्याच्या थोबाडात मारायला पाहिजे. असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद शहरात मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

‘शिवसेना प्रमुख हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहे. त्यांनी आम्हाला मोठं केलं. लाखो शिवसैनिक कामाला लावले. आणि आज अशा शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी करण्याचा आम्हाला अधिकार नाही. असे म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे.’ असे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यावेळी बोलताना म्हणाले.

 

औरंगाबाद येथील वाळूज परिसरात रांजणगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. यावर, माझे आजोबाही विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण होत आहे.’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केली होती. त्यावर आज औरंगाबाद येथे बोलताना संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावर
टीका केली. संदिपान भुमरे म्हणाले की, ‘माझा पुत्र अडीच वर्ष मुख्यमंत्री होता.
असे असताना अडीच वर्षे आपल्या वडिलांचे किंवा आजोबांचे चित्र लावावे हे सुचलं नाही.
पण ते काम एका शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केलं, म्हणून बाळासाहेबांना दुःख होत असेल.
अशी प्रतिक्रिया संदिपान भुमरे यांनी दिली आहे. तर सध्याचे रक्ताचे वारसदार हे बाळासाहेब होऊ पाहत असून,
ते कधीच बाळासाहेब ठाकरे होणार नाहीत. असा टोला देखील यावेळी बोलताना संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.

 

 

Web Title :- Sanjay Shirsat | sanjay shirsat statement after aditya thackeray criticism

 

हे देखील वाचा :

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | खासगी सावकाराची अवाजवी पैशांची मागणी, शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

 

Related Posts