IMPIMP

Jitendra Awhad | ‘मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील’ – जितेंद्र आव्हाड

by nagesh
Maharashtra Politics | 10 lakh reward cutting jitendra awhad tongue bjp obc morcha leader kapil dahekar in jalna

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन- ठाणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनादेखील निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पण त्यांनी ट्विट करत शिंदे सरकारला खोचक टोला लावला आहे. मागील पुलाच्या कार्यक्रमात त्यांच्यापासून 8 फूट अंतरावर उभा होतो, तर 354 चा गुन्हा दाखल झाला. आता त्यांच्या बाजूलाच जाऊन उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जितेंद्र आव्हाड ट्विटरवर लिहितात, ‘आज ठाणे महानगरपालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचा शुभारंभ आहे. पालिकेने मला आमंत्रण दिले आहे. पण, पूल उद्घघाटनाच्या वेळी त्यांच्यापासून 8 फूट अंतरावर होतो, तरी माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरे. परत पोलीस म्हणतील, वरून दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहे ना, मी हे करू शकत नाही. तुला कसं कळत नाही. खरंच कळत नाही. चलो ये वक्त भी गुजर जयेगा.’

 

 

मागील महिन्यात पुलाच्या उद्धघाटनप्रसंगी जितेंद्र आव्हाड मोठ्या अजचणीत सापडले होते.
त्यांनी एका महिलेला हाताने बाजूला सारल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भाजपशी संबंधित महिलेने हा आरोप केला होता. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते.
त्यामुळे जितेंद्र आव्हाड सावध झाले आहेत. त्यांना आमंत्रण तर आले आहे,
पण ते कार्यक्रमाला जाणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad tweet i will stand by the chief minister and the police will file a case of wallet punching challenging twitter

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील उच्चशिशित आरोपीला जामीन मंजूर

Pune Pimpri Crime | लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; वाकड परिसरातील घटना

Shah Rukh Khan | “कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता…’; शाहरुख खानने केला मोठा खुलासा

Joe Root | चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अनोखी शक्कल; Video व्हायरल

 

Related Posts