IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव कदम यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे हिंदुत्व सोडल्याच्या भाजपच्या आवईला छेद, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका (व्हिडिओ)

by nagesh
Shivsena Chief Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray press conference bajrang dals uddhav kadam joins shiv sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड मध्ये युती (Shivsena Sambhaji Brigade Alliance) झाल्यानंतर आज विश्व हिंदू
परिषदेचे नेते (Vishwa Hindu Parishad) उद्धव कदम (Uddhav Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav
Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर
(Shinde Group) टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेमध्ये येत आहेत.
आम्ही हिंदुत्त्व (Hindutva) सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही घटना असल्याचे उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) पुढे म्हणाले, आज संघ परिवारातील लोक हिंदुत्त्वाच्या शिवसेनेच्या परिवारात प्रवेश करत आहेत. हिंगोलीतील मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान आणि आश्चर्य़ वाटते. सर्वसाधारणत: सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशाची रांग असते. मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र पहायला मिळत आहे. कारण गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे.

 

 

हिंदुत्व बळकट करण्यासाठी एकत्र यावं

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, वेगवेगळ्या विचारांची बहुजन (Bahujan), वंचित काही ठिकाणी मुस्लीम (Muslim) बांधव देखील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. एक वेगळं वातावरण, चित्र महाराष्ट्रात निर्माण होत आहे. जे देशासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. अनेक विषय असून यावर मी दसरा मेळाव्यात (Shivsena Dasara Melava) बोलणार असल्याचे सांगत त्यांनी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. खरं हिंदुत्त्व शिवसेनेकडे आहे, असं ज्यांना वाटतं त्यांना मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे उघडे आहेत. केवळ शिवसेनेला नाही तर महाराष्ट्राची, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्त्व बळकट करण्यासाठी यावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दसरा मेळावा आमचाच

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी दोन वेळा अर्ज केले आहेत. मात्र मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation (BMC) अद्याप परवानगी मिळालेली नाही. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, दसरा मेळाव्यासंदर्भात सभ्रम नाही. दसरा मेळावा आमचाच होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

असे 56 लोक बघितले

शिवसेना ही रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी.
शिवसेनेला 56 वर्षे झाली आहेत, असे 56 लोक बघितलेली आहेत.
शिवसेना ही निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी आहे, गद्दारांच्या नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

 

Web Title : –  Shivsena Chief Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray press conference bajrang dals uddhav kadam joins shiv sena

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याकडून टॉमीने मारहाण

Shyam Global Technoventures | श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. (ओईएम, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड) द्वारे पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंनी घेतली ‘सागर’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण

 

Related Posts