IMPIMP

Shivsena | तुमच्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! शिवसेनेने व्यक्त केला शिंदे गटावर संताप, म्हटले – ही अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद

by nagesh
Maharashtra Politics | eknath shinde camp rahul shewale deepak kesarkar targets uddhav thackeray over shivsena issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत (Shivsena) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर दोन शकले उडाली आहेत. यानंतर मुळ शिवसेनेला (Shivsena) असंख्य धक्के शिंदे यांनी दिले. अनेक आमदार-खासदार शिंदे गटात गेले. आता तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेय. या सर्व घडामोडींवर शिवसेनेने आपला संताप सामना (Samana Editorial) या मुखपत्रातून व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील!

 

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्यामागे भ्रष्ट, बेइमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रातील जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे! त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार? असा सवाल शिवसेनेने (Shivsena) अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

 

 

अधम व नीच कृत्य एकनाथ शिंदे या गद्दाराने केले

 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ज्या प्रबोधनकारांनी (Prabodhankar Thackeray) मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले. ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे (Bal Keshav Thackeray) यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले. त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गद्दाराने केले आहे. तसे, या मंडळींनी केले नाही, शिवसेना म्हणजे सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांची माऊली आहे. त्या माऊलीवर हात टाकण्याचे व्यभिचारी कृत्य ज्यांनी केले त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे तळतळाट लागून, त्यांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्रिपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले

 

निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवून (Freezes)शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर (Deepak Kesarkar) यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय आहे. जगात न्याय आहे, असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रिपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले.

 

मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला.
महाराष्ट्र त्यामुळे आकांत करीत आहे. याआधी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे
(Narayan Rane) यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे (Raj Thackeray)
यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

 

 

Web Title :- Shivsena | shivsena criticized eknath shinde and shinde camp rebel mlas over ec freezes shivsena name and symbol

 

हे देखील वाचा :

Manisha Kayande | निवडणूक आयोगाच्या निर्णयात विरोधाभास आणि चमत्कारीकपणा – शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे

Pune Crime | बेकायदा फटाका विक्री स्टॉल सुरु करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई

Maharashtra Politics | हा चोरांचा बाजार आहे, त्यांनी आमचा पक्ष आणि पक्षचिन्ह चोरले, खासदार अरविंद सावंतांचा शिंदे गटावर घणाघात

 

Related Posts