IMPIMP

Shraddha Walker Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालावावे, केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती करणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shahmaharashtra

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Walker Murder Case) आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांना विनंती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी झालेल्या चर्चेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. (Shraddha Walker Murder Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण (Shraddha Walker Murder Case) ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिस (Delhi Police) करत आहेत. यापूर्वी श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याप्रकरणी कोणाचा दबाव होता का, याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

फडणवीस पुढे म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात 40 हून अधिक मोर्चे निघाले.
विविध मोठ्या 15 हून अधिक संघटनांनी त्यात सहभाग घेतला. आंतरधर्मीय विवाहाला (Interfaith Marriage) कोणाचा विरोध नाही.
मात्र, जाणीवपूर्वक एका षडयंत्राचा भाग म्हणून असे विवाह काही जिल्ह्यात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
यासंदर्भात काही राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करून अधिक प्रभावी कायदा करण्याचा विचार करण्यात येईल.
षडयंत्राचा भाग म्हणून कोणाची फसवणूक होऊ नये, हीच राज्य शासनाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

 

राज्यातील छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे.
केंद्रीय कायद्याचा अधिक्षेप करून आपण तो कायदा करतोय त्यामुळे विविध विभागांचे म्हणणे त्यामध्ये विचारात घ्यावे लागते.
यासंदर्भात राज्य शासन पाठपुरावा करत असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shraddha Walker Murder Case | Shraddha Walker murder case to be tried in fast track court, will request Union Home Minister; Information about Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Congress | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Love Jihad Law | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद कायदा’ होणार? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात मोठे विधान

Gram Panchayat Election Result 2022 | निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यु; जळगाव येथील घटना…

 

Related Posts