IMPIMP

Shripal Sabnis | राज्यपालांवर टीका करताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘नालायक राज्यपाल, अवदसा येऊन…’

by nagesh
Shripal Sabnis | literary shripal sabnis criticized the governor bhagat singh-koshiyari at osmanabad

उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यातच आता साहित्यिकांनी देखील राज्यपालांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस (Shripal Sabnis) यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. मात्र, टीका करताना श्रीपाल सबनिस (Shripal Sabnis) यांची जीभ घसरली. राज्यपालांना ते थेट नालायक म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा मातंग लहुजी शक्तीच्या वतीने होळी येथे एक दिवसीय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन (Annabhau Sathe Sahitya Sammelan) भरवण्यात आले होते. या कर्याक्रमाचे उद्घाटन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी अवदसा म्हणून राज्यपालांवर टीका केली.

 

श्रीपाल सबनिस (Shripal Sabnis) म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललंय काय, महापुरुषांची बदनामी केली जात आहे. नालायक राज्यपाल, अवदसा येऊन बसला आहे. त्याला महाराष्ट्राची ओळख नाही. महापुरुषांना विकृत रुप देत आहे. राज्यपालांसारखी दृष्य आवृत्ती नाही, हा माणूस मोदींनी आपल्याला भेट दिला आहे, अशा शब्दात सबनिस यांनी संताप व्यक्त केला.

 

अशा लोकांच्या विरोधात महाराष्ट्राने एक झाले पाहिजे. महाराष्ट्र झुंझार लढला पाहिजे.
आपली अस्मिता जपावी, महाराष्ट्राने देशाचे नेतृत्त्व करावे ही आपली परंपरा असल्याचे सबनिस म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यावरुन आता साहित्यिक देखील या वादात पडल्याचे पाहायला मिळत आहे.
सबनीस यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shripal Sabnis | literary shripal sabnis criticized the governor bhagat singh-koshiyari at osmanabad

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील महिलेचे लपून फोटो काढणे गुप्तहेरांना आले अंगाशी; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

Dr Vishwas Mehendale Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन
Sarla Ek Koti Trailer | ‘सरला एक कोटी’चा ट्रेलर लॉन्च; संगीताने लावले चार चाँद ! सरला भिकाच्या नशिबाची गोष्ट अन् श्रवणीय गाण्यांची पर्वणी

 

Related Posts