IMPIMP

Sudhir Mungantiwar | काँग्रेसची भूमिका नेहमीच शिवाजी आणि हिंदू देवतांच्या विरोधात राहिली आहे – सुधीर मुनगंटीवार

by nagesh
Sudhir Mungantiwar | The stance of Congress has always been against Shivaji and Hindu gods

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्यासाठी आम्ही हालचाली करत आहोत, असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जाहीर केले आहे. त्यावर काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोजगार आमचे सरकार देतच आहे. काँग्रेसची भूमिका नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेप घेणारी राहिली आहे. 6 जून 2024 रोजी शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या सुवर्णक्षणी आम्ही ती जगदंबा तलवार भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. रायगडावर आम्ही त्यावेळी आनंदोत्सव साजरा करणार आहोत. पण काँग्रेस नेहमीच शिवाजी, सावरकर आणि इतरांवर विरोधात बोलत आली आहे. त्यांची भूमिका नेहमीच विरोधात राहिली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्याला देखील काँग्रेसने विरोध करत, राम ही काल्पनिक कथा आहे, असे म्हंटले होते. त्यामुळे त्यांची ही भूमिका त्यांना अनुकूल आहे. रोजगार देणारे विभाग रोजगार देतच आहेत. आणि तलवार आणणारे विभाग तलवार आणण्याचे काम करतील. काँग्रेसला शिवाजी महाराजांवर प्रेम नाही, त्यामुळे ते असे बोलत आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.

 

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुनगंटीवार यांच्यावर तलवार परत आणण्याबद्दल भाष्य केले होते.
शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार परत भारतात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक
मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे.
पण महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग धंदे कोण परत आणणार? हजारो युवकांच्या हातचे काम निघून गेले आहे.
त्यामुळे त्यांनी तलवारीसोबत उद्योग देखील आणावेत. उद्योग गेले आणि रोजगार गेला.
त्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता हे सरकार लोकांच्या भावनेशी खेळून राजकारण करत
असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे रोजगार आणि तलवार दोन्ही आणण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे,
असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | The stance of Congress has always been against Shivaji and Hindu gods

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | “दाभोलकरांच्या साताऱ्यात…” रोहीत पवारांचा बावनकुळेंवर हल्ला

Ajit Pawar | मी पळून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – अजित पवार

Jitendra Awhad | अटकेच्या कारवाईवर जितेंद्र आव्हाड म्हणाले-‘फाशी दिली तरी चालेल, गुन्हा..’

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांची अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया, म्हणाले- “अजित पवार काय करतील याचा नेम नाही…”

 

Related Posts