IMPIMP

Suresh Lad | अजित पवार कोकण दौऱ्यावर असताना रायगड जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by nagesh
Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | NCP leader ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis led maharashtra government for neglecting farmer related issue

रायगड : सरकारसत्ता ऑनलाइन रायगड जिल्ह्यात (Raigad) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठा झटका बसला आहे. रायगडमधील कर्जत मतदारसंघाचे (Karjat constituency) माजी आमदार (Former MLA) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष (District President) सुरेश लाड (Suresh Lad) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. उपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कोकण दौऱ्यावर असतानात सुरेश लाड (Suresh Lad) यांनी राजीनामा दिला असून हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड (Suresh Lad) हे विधानसभेच्या कर्जत मतदार संघातून 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत निवडून आले होते.
मात्र 2019 मध्ये त्यांना पराभावाचा सामना करावा लागला होता.
शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी लाड यांचा पराभव केला होता.
मात्र तरीही त्यांचे पक्षातील महत्त्व कायम होते.

 

काही दिवसांपूर्वी त्यांची सिडकोच्या (CIDCO) अध्यक्षपदासाठी देखील चर्चा सुरु होती.
परंतु त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सुरेश लाड यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
परंतु त्यांच्या राजीनाम्यामागे काही राजकीय कारणे आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

 

Web Title : Suresh Lad | big blow ncp raigad district resignation former mla and partys raigad district president suresh lad when ajit pawar is on konkan tour

 

हे देखील वाचा :

Midnight Toilet Habit | अर्ध्यारात्री वारंवार ‘टॉयलेट’ला जावे लागते का? ‘या’ गंभीर आजाराचा असू शकतो संकेत

BJP MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

Keshav Upadhye | ‘तिजोरीत 600 कोटी पण कोरोनाकाळात जनतेला वाऱ्यावर सोडलं, मृतांच्या वारसांना मदत करा

 

Related Posts