IMPIMP

Sushmita Sen | बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचा आज 47 वा वाढदिवस; जाणून घ्या सुष्मिताच्या Love Life बद्दल

by nagesh
Sushmita Sen | bollywood actress and miss universe sushmita sen birthday special know her love life

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : आज सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स (Miss Universe) म्हणून सुष्मिताची ओळख आहे (Sushmita Sen). सुष्मिता नेहमीच विविध कारणाने चर्चेत असते. सुष्मिता जास्त चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिचे लव लाइफ.चला तर आज जाणून घेऊया तिच्या या लव लाइफ बद्दल. (Know Her Love Life)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुष्मिताचे नाव आतापर्यंत अनेकांशी जोडले गेले होते. त्यातील पहिले नाव म्हणजे दिग्दर्शक विक्रम भट्ट (Vikram Bhatt). 1996 मध्ये आलेल्या ‘दस्तक’ (Dastak) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख वाढली आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यावेळी सुष्मिता 20 ते 21 वर्षांची होती. मात्र विक्रम विवाहित असल्याने हे नाते काही फार काळ टिकू शकले नाही. रणदीप हुडासोबत (Randeep Hooda) देखील सुष्मिता सेनचे (Sushmita Sen) नाव जोडले गेले होते. तर अनेकदा या दोघांना एकत्रित स्पॉट देखील करण्यात आले होते. ‘कर्म और होली’ (Karma Aur Holi) दरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. तर या दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केले होते.

 

सुष्मिताचे नाव सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सचदेव (Banti Sachdeva) सोबत ही जोडले गेले होते. बंटी त्यावेळेस सुष्मिताचा मॅनेजर होता आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्या देखील चर्चेत होत्या. तर दिग्दर्शक मुदस्सर अजिज (Mudassar Aziz) सोबत देखील सुष्मिताचे नाव जोडले गेले. ‘दुल्हा मिल गया’ (Dulha Mil Gaya) या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची जवळीक वाढू लागली होती. एवढेच नाही तर सुष्मिता (Sushmita Sen) मुदस्सरच्या घरी देखील राहू लागली होती. सुष्मिताचे अफेअर पाकिस्तानचा प्रसिद्ध खेळाडू वसीम अक्रम (Wasim Akram) सोबत देखील असल्याचे बोलले जात होते. एका टीव्ही शो दरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. मात्र कधीही या दोघांनी त्यांच्या या नात्याला स्वीकारले नाही.

 

रोहमन शॉल (Rohman Shawl) आणि सुष्मिता सेन हे जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते.
एवढेच नाही तर सुष्मिताच्या मुलांसोबत रोहमनचे बॉण्डिंग देखील चांगले होते.
गेल्याच वर्षी सुष्मिताने (Sushmita Sen) सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे ब्रेकअप ची घोषणा केली होती.
आता या यादीत ललित मोदींचे (Lalit Modi) नाव जोडले गेले आहे.
ललित मोदींच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या लग्नाच्या बातम्यांच्या चर्चांना उधाण आले होते.
मात्र अद्याप तरी सुष्मिताने या नात्यावर अधिकृतरित्या काहीही उघडपणे सांगितले नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sushmita Sen | bollywood actress and miss universe sushmita sen birthday special know her love life

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | दारात उतारा ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्त्याला मारहाण, महिलेवर FIR; दापोडी मधील घटना

BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम

Pune Crime | कोरेगाव पार्क येथील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई

 

Related Posts