IMPIMP

Corona Vaccination : ‘कोरोना’ लस घेतल्याचं प्रमाणपत्र ‘आरोग्य विमा’ अन् ‘पासपोर्ट’साठी कामाला येणार, जाणून घ्या

by bali123
Corona Vaccines | Corona vaccines 50000 coronavirus vaccines will be wasted demand of private hospitals to change stocks as soon as possible

यवतमाळ : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सध्या कोरोनाची लस covid vaccine घेण्यासाठी सर्वजण धावपळ करत आहेत. पण लस घेतल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक ठरणार असल्याने ते जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रांमध्ये सशुल्क कोरोना लस covid vaccine देण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकसुद्धा लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, लस घेतली तर आपली जबाबदारी संपली असे होत नाही, तर लसीकरणानंतर मिळणारे प्रमाणपत्र किंवा पोच पावती जपून ठेवण्याचीसुद्धा गरज आहे.

कारण भविष्यात आरोग्य विमा कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले जाण्याची दाट शक्यता आहे. हे प्रमाणपत्र नाही दाखवले तर तुम्हाला विम्याचा लाभ न मिळण्याची किंवा विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील १३ आकडी संदर्भ क्रमांक जवळ असणे गरजेचे आहे. तसेच पासपोर्ट काढण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी, आंतरराज्यीय प्रवासासाठी या प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. इतकेच नाहीतर लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेलमध्ये ॲडमिशन, ऑपरेशन आदीच्या वेळीही कोराेना लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज लागणार आहे.

यासंदर्भात एलआयसीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांच्याकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. मेडिक्लेम पाॅलिसींकरिता खासगी विमा कंपन्यांकडून कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र मागवण्यात येणार आहे, तर एलआयसीच्या जीवन आरोग्य विम्यासाठीसुद्धा या प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. असे एलआयसीच्या मार्केटिंग विभागातील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. या अनुषंगाने लाभार्थ्यांकडून एक फाॅर्म भरून घेतला जातो. त्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्र हे बंधनकारक केले नाही. परंतु आमच्या गाइडलाइनमध्ये दर आठवड्याला बदल करण्यात येतो. त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ शाखा प्रबंधक दिलेश बागडे यांनी सांगितले आहे.

प्रायव्हेट सेक्टरमधील नोकरदारांनी लक्ष द्या ! 1 एप्रिलपासून लागू होऊ शकते सॅलरीची नवीन सिस्टीम, जाणून घ्या काय होणार परिणाम

शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांचं ठरलं ! राज्याला मिळणार नवा गृहमंत्री ? अजित पवार यांच्यासह ‘या’ नावाची जोरदार चर्चा

पवार अन् मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री मंडळात फेर बदलाचे ‘संकेत’; गृहमंत्रीपदी नवीन मंत्र्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता

PPE किट घातलेली व्यक्ती वाझे की आणखी कुणी ?, NIA वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार, गूढ उलगडणार?

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

Related Posts