IMPIMP

Udayanraje Bhonsle | बुद्धी भ्रष्ट झालीये काय? कोश्यारींना पदावरुन मुक्त करा, उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

by nagesh
Udayanraje Bhonsle | udyanraje bhosale press conference over governor bhagatsingh koshyari and sudhanshu trivedi controversial statement on shivaji maharaj pune news

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिवरायांचे विचार जुने झाले हे कोश्याऱींचे वक्तव्य ऐकल्यानंतर मला तीव्र संताप आला. त्यांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटलं, याआधीही त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली आहेत. शिवराय अनेक महापुरुषांचे स्फूर्तीस्थान होते. मग आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या शिवरायांचे विचार जुने कसे? असा सवाल करत राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून मुक्त करावं, असा आक्रमक पवित्रा भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी घेतला. तसेच भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवदी यांच्यावर ही उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला. ते पुण्यात पत्रकार (Udayanraje Bhonsle) परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधताना उदयनराजे भोसले म्हणाले, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली की काय? लाज वाटत नाही का या लोकांना. शिवरायांनी माफीनामा लिहून दिला, याला पुरावा काय? असा सवाल करत त्रिवेदी-कोश्यारी यांच्यावर उदयनराजे (Udayanraje Bhonsle) तुटून पडले. तसेच मंचावर उपस्थित शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

तर शिवरायांचे विचार आवश्यक

उदयनराजे पुढे म्हणाले, सर्वधर्म समभाव हा शिवरायांचा विचार होता. रयतेसाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली.
सगळ्या धर्माचा, पंथाचा त्यांनी आदर केला. त्यांनी सामाजिक सौहार्द टिकवला. देव आपण कुणी पाहिला नाही.
शिवाजी महाराज हे देवापेक्षा कमी नव्हते. देश अखंड ठेवायचा असेल तर शिवरायांचे विचार आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

28 तारखेला पुढची भूमिका जाहीर करणार

शिवरायांबद्दल बोलणाऱ्या अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. पक्ष वगैरे बघणार नाही, येत्या 28 तारखेला पुढची भूमिका जाहीर करेन. पण ज्या व्यक्तीला राज्यपाल पदाचं भान राहत नाही, जबाबदारीची जाणीव नाही, त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही, असंही उदयनारजे यांनी ठणकावून सांगितले.

 

माझा विरोध कोश्यारींना नाही तर…

सर्वधर्म समभाव हीच स्वराज्याची संकल्पना त्यावेळी शिवाजी महाराजांनी मांडली.
शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीधर्मातील लोकांचा सन्मान केला. प्रत्येक धर्मातील लोकांचा आदर केला.
इतिहासात वळून पाहिलं त्यातून बरंच काही घेण्यासारखं आहे.
असं सगळं असताना महाराजांचा अवमान करण्याचं कारण काय? असा सवाल करत राज्यपाल कोश्यारींना
माझा विरोध नाही. माझा विरोध कोश्यारी सारख्या प्रवृत्तीला असल्याचे उदयनराजे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Udayanraje Bhonsle | udyanraje bhosale press conference over governor bhagatsingh koshyari and sudhanshu trivedi controversial statement on shivaji maharaj pune news

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा तसा वाटला का?; अजित पवारांचे टिकास्त्र

Abhijeet Sawant – Indian Idol Show | ‘छोटे छोटे कार्यक्रम करून फीसाठी जमवायचो पैसे’ ! अभिजित सावंतने सांगितला ‘इंडियन आयडल’पर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास

Aurangabad ACB Trap | गाडी सोडविण्यासाठी 5 हजारांची लाच मागणारा पोलीस अटकेत

Supriya Sule On CM Eknath Shinde | ‘डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य पणाला लावले, त्यामुळे महत्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे, अंधश्रद्धा नाही’

 

Related Posts