IMPIMP

Aurangabad ACB Trap | गाडी सोडविण्यासाठी 5 हजारांची लाच मागणारा पोलीस अटकेत

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – बजाज फायनान्स कंपनीने गाडीचे हफ्ते थकले म्हणून एका इसमाची गाडी त्याला मारहाण करत जप्त करुन नेल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी दुचाकीच्या मालकाने पोलिसांत तक्रार दिली असता, तेथील पोलिसाने त्यांच्याकडे गाडी सोडवून देण्यासाठी पाच हजारांची लाच (Aurangabad ACB Trap) मागितल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागास (Aurangabad ACB Trap) तक्रार देण्यात आली. त्यानुसार विभागाने कारवाई करत लाचखोर पोलीस नाईकास ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बजाज फायनान्स कंपनीच्या वसुली पथकाच्या लोकांनी मारहाण करुन दुचाकी नेल्याने तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतली. पण त्यांना दुचाकी सोडवून देण्यासाठी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आरोपी प्रकाश धोंडीबा सोनवणे (वय – 49) यांनी पाच हजारांची लाच मागितली. त्यानुसार पथकाने सापळा रचत सोनवणे यास पाच हजार रुपये लाच पंचासमोर स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली.

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,
पोलीस उप अधीक्षक मारूती पंडित, पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस अंमलदार सुनील पाटील,
राजेंद्र जोशी, विलास चव्हाण, अशोक नागरगोजे, चालक चांगदेव बागूल यांनी केली.

 

Web Title :- Aurangabad ACB Trap | A policeman who demanded a bribe of 5 thousand to fix the car was arrested

 

हे देखील वाचा :

Abhijeet Sawant – Indian Idol Show | ‘छोटे छोटे कार्यक्रम करून फीसाठी जमवायचो पैसे’ ! अभिजित सावंतने सांगितला ‘इंडियन आयडल’पर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास

Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या ! ‘अशा व्यक्तीने राज्यपालासारख्या पदावर असू नये’ – शरद पवार

Ajit Pawar On CM Eknath Shinde | ‘मुख्यमंत्री ज्योतिषाकडे भविष्य बघून अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहेत’; अजित पवारांचा आरोप

 

Related Posts