IMPIMP

Uddhav Thackeray On Maharashtra Karnataka Border Issue | ‘मुख्यमंत्री म्हणतील 40 गाव कर्नाटकाला जाऊ द्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर 100 गाव महाराष्ट्रात घेऊ’; ठाकरेंनी घेतली शिंदेंची फिरकी

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackerays reaction on income tax raid at bbc office

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Uddhav Thackeray On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत
तालुक्यावर दावा सांगण्याचा विचार कर्नाटक गांभीर्याने करत आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. त्यामुळे महाराष्ट्र
कर्नाटक सीमावाद पुन्हा सुरु झाला. या वादामुळे शिंदे फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून चौफेर टीका
होत आहे. आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख स्वतः उद्धव ठाकरे यांनी या वादासंबंधी महाराष्ट्र सरकारवर हल्ला केला आहे. तसेच उद्धव
ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरही त्यांची कानउघडणी केली. (Uddhav Thackeray On Maharashtra Karnataka Border
Issue)

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगतात. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवतांचा अपमान होत आहे. पण मुख्यमंत्र्यांना त्याची कसलीही खंत किंवा चिंता नाही. काहीतरी गोलमाल उत्तर देऊन ते ही वेळही मारून नेतील. मलातर, या राज्याला मुख्यमंत्री आहे का तेच कळत नाही. ते कधीही बोलत नाहीत. महाराष्ट्रातील 40 गावं कर्नाटकमध्ये जात असतीत तर मुख्यमंत्री नेहमीच्या शैलीत उत्तर देतील. ‘काळजी करु नका. मी पंतप्रधानांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं आहे की, कर्नाटकने महाराष्ट्रातील 40 गावं घेतली तर घेऊ दे. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर 100 गावं महाराष्ट्राला देऊ,’ असं कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या सरकारचा बचाव करण्यासाठी, मी पंतप्रधान मोदींना फोन केला आहे,
ते महाराष्ट्राला त्याच तोडीचा प्रकल्प देणार आहेत, अशी माहिती दिली होती.
त्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी आज कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फिरकी घेतली.
शिवाय, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
‘ही शक्कल एकट्या राज्यपालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही.
त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray On Maharashtra Karnataka Border Issue | uddhav thackeray press conference in mumbai slams eknath shinde and bhagat singh koshyari

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | दोन लाखाची लाच मागणाऱ्या पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर अँन्टी करप्शनकडून FIR

Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | उध्दव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, म्हणाले – ‘वृध्दाश्रमात जागा नसणार्‍यांना राज्यपाल नेमलं…’

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; द गेम चेंजर्स संघाचा सलग दुसरा विजय

 

Related Posts