IMPIMP

Uddhav Thackeray | “जे स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये”; राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचे भाजपला उत्तर

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra winter session 2022 shivsena uddhav balasaheb thackeray group ousted from list of table chairpersons

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – हिंदुत्वाचे (Hindutva) मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantyaveer Savarkar) यांच्यावर काँग्रेस
नेते राहुल गांधी (Congress Leader rahul Gandhi) यांनी काल त्यांच्या भाषणात टीका केली होती. मात्र या वक्तव्यामुळे शिवसेना ( उद्धव ठाकरे गट
) (Shivsena) चांगलीच अडचणीत आली आहे. शिवसेनेने हिंदुत्वाची विचारसरणी अजून सोडली नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे गट (Uddhav
Thackeray Group) घेत असतो. मात्र त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महाआघाडी त्यांनी स्थापन केली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्याशी उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) सहमत आहे का? असा प्रश्न भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) विचारात आहे. आता त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घाबरून इंग्रजांना माफीनामा लिहिला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण त्यापैकी कोणीही माफीनाम्यांची कोणतीही चिठ्ठी लिहिली नाही. पण सावरकरांनी घाबरल्यामुळे माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला.’ असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले,”सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाशी
मी सहमत नाही. मी आजही स्पष्टपणे सांगतो, सावरकरांबद्दल जी आदर, प्रेम, आपुलकी आमच्या मनात आहेच.
तो कधीही पुसला जाणार नाही. पण जे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांना स्वातंत्र्यावीरांबद्दल बोलण्याचा
अजिबात अधिकार नाही. स्वातंत्र्यलढ्यात तुमचे किती कार्यकर्ते होते हे आधी पाहावं मग सावरकरांवर बोलावं.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray says he dont agree with rahul gandhi statement about veer savarkar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीचा खून करुन गतिमंद मुलाला गुन्ह्यात अडकवले, पोलिसांच्या तपासात फिर्यादीच निघाला आरोपी

Ajit Pawar | ‘…बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल’ – अजित पवार

Pune Police CP Amitabh Gupta | गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत आवश्यक, नवनियुक्त उपायुक्तांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा कानमंत्र

 

Related Posts