IMPIMP

UMANG App | उमंग अ‍ॅपद्वारे सहजपणे घ्या Aadhaar संबंधी सर्व सुविधांचा लाभ, पहा UMANG सोबत आधार लिंक करण्याची पद्धत

by nagesh
UMANG App | take advantage of all the facilities related to aadhaar easily through umang app see how to link aadhaar with umang

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UMANG App | सरकारने सुरू केलेल्या ’उमंग’ चा वापर करून तुम्ही अनेक सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये केंद्र, राज्य आणि स्थानिक सेवांचा समावेश करण्यात आला आहे. उमंग अ‍ॅपवरच तुम्हाला आधारशी संबंधित सेवा (Aadhaar related services) देखील मिळतात. नंतर समावेश केलेल्या काही सेवांपैकी ही एक आहे. डिजिटल इंडियाने अलीकडेच एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, उमंग अ‍ॅप (UMANG App) वर आधारच्या सेवांचा विस्तार करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता तुम्ही उमंग अ‍ॅपद्वारे आधार डाउनलोड करू शकता. याशिवाय तुम्ही व्हर्च्युअल आयडीही जनरेट करू शकता. यासोबतच तुम्ही उमंग अ‍ॅपवर पेमेंट आणि रिफंड हिस्ट्री देखील पाहू शकता.

 

उमंग अ‍ॅपवर आधारसंबंधीत सेवा

उमंग अ‍ॅपवरून तुम्ही आधारची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकता. यावर डिजिटल स्वाक्षरी असते आणि पासवर्डने संरक्षित असते. तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कोणाला द्यायचा नसेल, तर तुम्ही तुमचा व्हर्च्युअल आयडी देऊ शकता. उमंग अ‍ॅपद्वारे तुम्ही हे 16 अंकी व्हर्च्युअल आयडी देखील जनरेट करू शकता. तसेच अ‍ॅपवर तुम्ही ’ई-केवायसी डॉक्युमेंट’ डाउनलोड करू शकता ज्याचा वापर तुमची ऑफलाइन पद्धतीने ओळख देण्यासाठी करू शकता. उमंग अ‍ॅपवरच, तुम्ही तुमचा आधार क्रमांक पडताळणीसाठी कुठे वापरला गेला आहे याचा शोध घेऊ शकता. तुम्ही उमंग अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक्स लॉक आणि अनलॉक देखील करू शकता. (UMANG App)

 

कसा करावा आधार सेवेचा वापर

यासाठी तुम्हाला प्रथम फोनवर उमंग अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.
यानंतर, तुम्ही अ‍ॅपमध्ये लॉग इन करा आणि ’माय आधार’ पर्याय निवडा आणि तुमचे आधार लिंक करा.
आधार लिंक करण्यासाठी आधार क्रमांक, कॅप्चा कोडवर क्लिक करा आणि ओटीपी पाठवा.
यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो प्रविष्ट करा आणि ’सेव्ह’ वर क्लिक करा.
एकदा आधार लिंक झाल्यावर तुम्ही उमंग अ‍ॅपवर संबंधित सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.

 

उमंग अ‍ॅप काय आहे

उमंग हे केंद्र सरकारने लाँच केलेले बहु-कार्यक्षम अ‍ॅप आहे.
याद्वारे तुम्ही प्राप्तीकर, ईपीएफओ, गॅस सिलिंडर, पासपोर्ट आणि आधार यासारख्या अनेक सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता.
हे अ‍ॅप नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केले आहे.
उमंग अ‍ॅपवर तुम्ही एकूण 127 विभाग आणि सर्व सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  UMANG App | take advantage of all the facilities related to aadhaar easily through umang app see how to link aadhaar with umang

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | दारूच्या नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरणं बेतलं जीवावर, चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Celery Decoction | सर्दी-खोकल्यापासून सुटका करण्यास उपयोगी ओव्याचा काढा, बूस्ट होईल इम्यूनिटी

Post Office Scheme | 14 लाख रुपयांचा फंड बनवण्यासाठी Post Office च्या योजनेत रोज करायचेत केवळ 95 रुपये जमा

 

Related Posts