IMPIMP

Celery Decoction | सर्दी-खोकल्यापासून सुटका करण्यास उपयोगी ओव्याचा काढा, बूस्ट होईल इम्यूनिटी

by nagesh
Celery Decoction | how to make immunity booster ajwain kadha for cold and cough khansi jukam

सरकारसत्ता ऑनलाइन –  Celery Decoction | कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे सर्दी. मात्र, कोणत्याही महिन्यात होणार्‍या आजारांमध्ये सर्दी, खोकला, ताप (Cold, Cough, Fever) हे आजार आहेत. पावसाळ्यात त्याचा प्रसार झपाट्याने होतो. हे अनेक प्रकारच्या संसर्गाशी निगडीत आहे, जेव्हा इम्युनिटी कमकुवत असते तेव्हा सर्दी, खोकला आणि फ्लू (Flu) होण्याचा धोका वाढतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची (Home Remedies) मदत घेऊ शकता. ओवा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्यापासून बनवलेल्या काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दीपासून आराम मिळतो. (Celery Decoction)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ओवा वाढवतो इम्युनिटी (Ajwain Boosts Immunity)
ओव्याचा वापर भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या काळापासून केला जात आहे. ओव्याची एक वेगळी तिखट चव असते जो लोणचे, करी आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी वापरलो जातो. याचे बहुतांश औषधी गुणधर्म (Medicinal Properties) त्याचा अ‍ॅक्टिव्ह घटक थायमॉलमधून येतात जे तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात. (Celery Decoction)

 

सर्दी आणि खोकल्यात ओवा असा आहे फायदेशीर (How Celery Is Beneficial In Cold)
ओवा एक अँटिऑक्सिडेंट आहे, जो फ्री रेडियल हालचाली रोखण्यास मदत करतो. ओव्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतात, जे तुम्हाला हंगामी संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. सर्दी, चोंदलेले नाक आणि छातीमधील कंजेक्शनमुळे होणारी अस्वस्थता दूर करण्यात मदत होते.

 

असा तयार करा ओव्याचा काढा (How to make Ajwain decoction)

साहित्य

2 चमचे ओवा (Ajwain)
तुळशीची पाने (Tulsi leaves)
1 टीस्पून काळीमिरी (Black pepper)
1 चमचा मध (Honey)

 

कृती (how to make)
काढा बनवण्यासाठी पॅनमध्ये ओवा, तुळशीची पाने, काळी मिरी, एक कप पाणी घालून 5 मिनिटे शिजवा. ते गाळून त्यात मध टाकून प्या. काढा बनवताना त्यात मध घालू नये हे लक्षात ठेवा. अति उष्णतेमुळे मधाचे औषधी गुणधर्म नष्ट होतात. हा काढा दिवसातून दोनदा प्यायल्याने लवकर आराम मिळतो. काढ्याची तिखट चव आवडत नसेल तर गरम पाण्यात मूठभर ओवा टाका टाकून दिवसभर प्यावे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Celery Decoction | how to make immunity booster ajwain kadha for cold and cough khansi jukam

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | 14 लाख रुपयांचा फंड बनवण्यासाठी Post Office च्या योजनेत रोज करायचेत केवळ 95 रुपये जमा

Home Stay | ‘होम स्टे” बनला गावातील तरूणांचा रोजगाराचा मार्ग; जाणून घ्या ‘होम स्टे’ म्हणजे काय?

LIC MCap | आता टॉप-10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर फेकली गेली एलआयसी, इतके झाले मार्केट कॅप

 

Related Posts