IMPIMP

Vasant More | ‘…तर मी पाच नगरसेवक निवडून आणू शकतो’ – वसंत मोरे

by nagesh
MNS Leader Vasant More | mns vasant more says will not go to city office of party after meeting with amit thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Vasant More | औरंगाबादच्या सभेनंतर भोंगे उतरवण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते (MNS Activists) चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली होती. असं असताना मात्र मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) कुठल्याही आंदोलनात सहभागी नव्हते. त्यामुळे अनेक चर्चा होत होत्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वसंत मोरे (Vasant More) यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले होते की, ”त्यावेळी मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीया निमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. पण, माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार मतभेद असले तरी मनभेद नाहीत.” असं ते म्हणाले होते.

 

दरम्यान, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांची (Pune Police) भेट घेतली आहे. यावेळी वसंत मोरे आणि मनसेचे शिष्टमंडळ वेगळे असल्याचे दिसून आले. यावरुन वसंत मोरेंना विचारले असता ते म्हणाले की, ”एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे. माझ्याकडे शहराची जबाबदारी नसली तरी माझ्याकडे 3 प्रभागांची जबाबदारी दिली तर त्यातून मी पाच नगरसेवक निवडून आणू शकतो.” असं ते म्हणाले.

 

”राज ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात.
सगळे खळखळणारे आहेत. त्यापैकी मी एक खळखळणारा आहे. माझी वाट नेहमी वेगळीच असते.
माझं ध्येय धोरण असत, पक्ष वाढवणे, अधिकाधिक जागा निवडून आणणे हे आहे. 3 प्रभागांमधून 9 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक मनसेचे असतील असे ते म्हणाले. शहराची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. माझं 25 नगरसेवकांचे टार्गेट होते. माझ्या भागातील नगरसेवक कसे वाढतील याकडे लक्ष देतोय. माझा मार्ग राजमार्ग आहे.” असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vasant More | so i can elect 5corporator preparations muncipal corporation elections said vasant more

 

हे देखील वाचा :

Facebook Nearby Friends Feature | फेसबूक 31 मेपासून काही महत्त्वाचे फीचर्स बंद करणार

Cosmo Films Shares | गुंतवणूकदारांची चांदी ! ‘हा’ शेअर अवघ्या 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला

Pune NCP | पाणी प्रश्नाबाबत आणि मिळकत कर वाढ रद्द करण्याबाबत राष्ट्रवादीचे पालिका आयुक्तांना निवेदन

 

Related Posts