IMPIMP

Vinayak Raut | चंद्रकात पाटलांनी सकल मराठा समाजात फूट पाडण्याचा केला प्रयत्न – विनायक राऊत

by nagesh
MP Vinayak Raut | shivsena MP Vinayak Raut on cm eknath shinde group mp prataprao jadhav

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची मराठा समाजासंदर्भात दोन कार्यकर्त्यांच्या संभाषणाची ध्वनी फित (Audio Clip) समाज माध्यामांवर प्रसारीत झाली होती. या ध्वनी फितीमुळे राज्याच्या राजकारणात मोठे राजकारण रंगले आहे. मराठा समाजात चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाष्य केले आहे. चंद्रकात पाटलांनी सकल मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असा मोठा आरोप विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजात फूट पाडली. त्यांनी केवळ आपल्या पक्षाचा हेतू आणि स्वार्थ नजरेसमोर ठेऊन ही फूट पाडली आहे. चंद्रकांत पाटील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला हे आता उघड झाले आहे. आणि त्यांच्याकडून हे घडणे निषेधार्ह आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

 

यावेळी त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभेच्या (Andheri By Election|) रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीवर देखील भाष्य केले. राज्यात सध्या आडमुठेपणाचे धोरण सुरु आहे.
त्याचे उत्तम उदाहारण म्हणजे, ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा राजीनामा मंजूर न करणे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर राजकीय दबाव टाकला गेला आहे.
त्यामुळे लटके यांचा राजीनामा प्रलंबित आहे, असे राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

 

ऋतुजा लटके यांच्यासारख्या विधवा स्त्रीला विधानसभेत जाण्यापासून रोखण्याचे काम राज्य सरकार करत आहे.
लटके यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचे देखील विनायक राऊत यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Vinayak Raut | Chandrakat Patil tried to divide the entire Maratha community

 

हे देखील वाचा :

Bacchu Kadu | बच्चू कडूंनी पुन्हा जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, मंत्रिपदाबाबत म्हणाले – अडीच वर्षानंतर होईन

Jalgaon ACB Trap | माती वाहतूक करणाऱ्याकडू दीड लाख रुपये लाच घेताना सर्कल व तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

T20 World Cup 2022 | भारतासह ‘हे’ तीन संघ असणार सेमीफायलनमध्ये, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वर्तवलं भविष्य

 

Related Posts