IMPIMP

Warkari Will Get Insurance Cover By Maharashtra Govt | वारकर्‍यांसाठी खुशखबर ! वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; 5 लाख रूपयापर्यंतचं अनुदान मिळणार

by nagesh
Warkari Will Get Insurance Cover By Maharashtra Govt | Pandharpur Ashadhi Wari Vitthal Rukmini Warkari Bima Chhatra Yojana

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Warkari Will Get Insurance Cover By Maharashtra Govt | पंढरपूरच्या आषाढी वारीत (Pandharpur Ashadhi Wari) सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना (Vitthal Rukmini Warkari Bima Chhatra Yojana) लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. (Warkari Will Get Insurance Cover By Maharashtra Govt)

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील (Warkari Insurance). अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि
त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो.
यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे

Web Title : Warkari Will Get Insurance Cover By Maharashtra Govt | Pandharpur Ashadhi Wari
Vitthal Rukmini Warkari Bima Chhatra Yojana

Related Posts