IMPIMP

WhatsApp Upcoming Features | व्हॉट्सअ‍ॅप आणतंय ‘हे’ 6 नवीन फिचर्स; जाणून घ्या

by nagesh
Bug In Whatsapp | cert issued alert regarding dangerous bug in whatsapp threat of data leak hovered

सरकारसत्ता ऑनलाइन – WhatsApp Upcoming Features | संपूर्ण जगात व्हॉट्सॲपचं (WhatsApp) जाळं पसरलं आहे. अनेकवेळा कंपनी WhatsApp मध्ये नवनवे फिचर्स (WhatsApp Features) आणत असते. तसेच सतत अपडेट (Update) देखील करण्याच्या सुचना कंपनीकडून देण्यात येत असतात. तसेच मागील काही दिवसांत असंच काही बदल झाल्याचे व्हॉट्सॲपच्या WABetaInfo या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडियावर सांगण्यात आलेय. WhatsApp आपल्या युजर्ससाठी असेच काही नवनवे फीचर्स बाजारपेठेत आणण्यासाठी चाचणी सुरु आहे. याबाबत कंपनीने कोणते नवीन फीचर्स आणले आहे.? याबाबत सविस्तर जाणून घ्या. (WhatsApp Upcoming Features)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. मेसेज रिअ‍ॅक्शन (Message Reactions) –
WhatsApp मध्ये इमोजी रिअ‍ॅक्शन (Emoji reaction) हे नवीन फीचर आहे. यात आपण इमोजीच्या माध्यमातुन एखाद्याच्या संदेशावर प्रतिक्रिया देऊन आपल्या भावना व्यक्त करू शकतो. जर एखाद्याने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अथवा दुसरा एखादा संदेश पाठवला तर, तुम्हाला शब्द टाईप न करता प्रतिक्रिया द्यायची असेल तर या फीचर अंतर्गत तुम्ही इमोजीचा वापर करु शकता. (WhatsApp Upcoming Features)

 

2. WhatsApp वर ग्लोबल व्हॉईस नोट प्लेयर –
ग्लोबल व्हॉईस नोट प्लेयर हे फीचर व्हॉईस मेसेजशी संबंधित आहे. हे फीचर आणल्यानंतर यूजर्स बॅकग्राउंडमध्ये WhatsApp चॅट विंडोमध्ये प्ले केलेला व्हॉइस मेसेज ऐकू शकतील असे सांगण्यात येतंय. युजर्सना व्हॉईस मेसेजच्या खाली पॉज आणि रिझ्युमचा पर्याय दिसणार आहे, जो चॅटच्या बाहेर देखील उपस्थित असेल. त्याचबरोबर, वेव्ह फॉर्म व्हिज्युअलायझेशन (Waveform visualization) अंतर्गत, युजर्सना व्हॉइस मेसेज ऐकण्याचा चांगला अनुभव मिळणार आहे.

 

3. नवीन इमोजी –
या युनिकोडमधील नवीनतम समाविष्ट केलेल्या इमोजी आहेत. ज्याचा वापर आपल्याला संदेशावर प्रतिक्रिया देण्यासाठी करण्यात येणार आहे. काही इमोजी हे त्वचेसंबंधी रिअ‍ॅक्शनला समर्थन देतात. हे सर्व इमोजी केवळ बीटा व्हर्जनसाठीच उपलब्ध असणार आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. Call आणि सेव्ह नंबरमध्ये संदेशांमधून जाता येणार –
व्हॉट्सॲपने संदेशांमध्ये प्राप्त झालेल्या फोन नंबरसाठी नवीन पॉप – अप मेनूची चाचणी सुरू केलीय. या नवीन फीचर्समध्ये तुम्हाला चॅटमध्ये नंबरवर क्लिक केल्यास डायल करायचा की तुम्हाला तुमच्या संपर्कांमध्ये जोडायचा हे निवडण्याची परवानगी विचारणार आहे.

 

5. Forward करणे लिमिटेड –
एकापेक्षा जास्त ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करण्यावर बंदी घालणार आहे.
मेसेजिंग अ‍ॅप या फीचरची चाचणी सध्या सुरूय.
हे फीचर आल्यास अनेक यूजर्सच्या अडचणी वाढतील, जे मेसेज फॉरवर्ड फीचरचा अधिक वापर करतात. आणि फॉरवर्ड केलेले मेसेज एका वेळी एकापेक्षा अधिक ग्रुप चॅटवर फॉरवर्ड करणे शक्य होणार नाही.
या निर्णयामुळे काही प्रमाणात फेक न्यूज अथवा चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.

 

6. कॅमेरा इंटरफेसही होणार अपडेट –
WhatsApp आपला कॅमेरा इंटरफेसही अपडेट करणार असल्याचे समजते.
WhatsApp चे हे कॅमेरा अपडेट फीचर iOS युजर्संसाठी आधीच उपलब्ध होते परंतु, काही युजर्सच्या तक्रारींमुळे ते काही काळासाठी थांबवण्यात आले होते.
आता कंपनी हे फीचर अँड्रॉईड यूजर्ससाठीही सादर करणार आहे.
हे अपडेट युजर्सना फोटो अथवा व्हीडीओ सिलेक्ट करताना 1 नवीन डिझाईन दिसत आहे.
तसेच स्क्रीनच्या बाजूला कॅमेराचा मीडिया बार देखील दिसतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- WhatsApp Upcoming Features | WhatsApp Upcoming Features these are the new features brought by whatsapp

 

हे देखील वाचा :

Mahavikas Aghadi Government | शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादावरून लढाई तर दुसरीकडे काँग्रेसचा स्वबळाचा नारा !

Summer Tips | उन्हाळ्यात Tanning पासून बचाव करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Osmanabad Police | आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; डोळ्यात चटणी टाकून पोलिसांना बेदम मारहाण; PSI जखमी

 

Related Posts