IMPIMP

Wrestlers Protest | बृजभूषण सिंह यांना का पाठीशी घातलं जातंय?, कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

by nagesh
Wrestlers Protest | thackeray group ambadas danve slams modi govt over police action against wrestlers protest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप असलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांच्याविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Agitation) चिरडण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रविवारी (दि.28) नव्या संसदेचं देशाला लोकार्पण (New Parliament Building Inauguration) होत असतानाच आंदोलक कुस्तीपटूंना (Wrestlers Agitation) रस्त्यावर अक्षरश: फरफटत नेत अटक केली.

ऑलिम्पिक विजेते (Olympic champion) कुस्तीगीर बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik), संगीता फोगट (Sangeeta Phogat) आणि विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह महिला कुस्तीपटूंना ज्या पद्धतीने ताब्यात घेत दिल्ली पोलिसांकडून वागणूक (Wrestlers Agitation) देण्यात आली त्यावरून देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्ला चढवला आहे. सोशल मीडियातही दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईवार शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, एकीकडे आपण लोकशाहीच्या मंदिराचं उद्घाटन केलं असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचं जगभर नाव मोठं करणारे जे कुस्तीपटू लोकशाही मार्गाने आंदोलन (Wrestlers Protest ) करत आहेत, त्यांना बळाचा वापर करुन ताब्यात घ्यायचं, हा प्रकार निषेधार्ह आहे.

कोंबून, दाबून ताब्यात घेतलं

दानवे पुढे म्हणाले, कुस्तीपटू लोकशाही मार्गाने गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. त्यांनी देश-विदेशात, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या देशाचं नाव मोठं केलं आहे. मात्र त्यांना ओढून-ताणून, कोंबून, दाबून ताब्यात घेण्यात आलं, हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे.

बृजभूषण सिंह यांना का पाठीशी घातलं जातंय?

खरंतर या कुस्तीपटूंच्या मागण्या फार मोठ्या नाहीत.
कुस्ती संघटनेचे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्यावर काही आरोप आहेत.
मात्र त्याला भाजप (BJP) किंवा केंद्र सरकार (Central Government) किंवा भारताचं ऑलिम्पिक असोसिएशन
(Olympic Association of India) का पाठीशी घालतंय हे कळायला मार्ग नाही.
भारताचं नाव मोठ करणाऱ्या या खेळाडूंना अशा प्रकारची वागणूक देणे फार चुकीचं आहे.
हे लोकशाहीच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. या खेळाडूंना सहज ताब्यात घेता आलं असतं, मात्र तसं केलं नाही,
असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

Web Title : Wrestlers Protest | thackeray group ambadas danve slams modi govt over police action against wrestlers protest

Related Posts