IMPIMP

कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा जेलमधून सुटका; एक्सप्रेस हायवेवरुन काढली जंगी मिरवणूक

by sikandershaikh
gajanan-marne

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) दोन खुनाच्या खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर आणखी काही खटले नसल्याने सोमवारी कुख्यात गुंड गजानन मारणेची (gajanan marne) तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहाबाहेर त्याच्या स्वागतासाठी हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्याची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात 300 हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या.

2014 मध्ये पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात त्यानंतर कोल्हापूरला हलवण्यात आले. अलीकडे त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले हाेते.
सोमवारी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी गजानन मारणे (gajanan marne) हा कारागृहाबाहेर आला.
यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव होता.
त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्सप्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाल्या.

विना टोल प्रवेश

टोल नाक्यावरून विना टोल एकही वाहन जात नाही किंवा कर्मचारी वाहन सोडत नाही असे चित्र दिसते.
पण ज्यावेळी एक्सप्रेस हायवेवरुन मागेपुढे गजानन मारणे (gajanan marne) व त्याचे समर्थक पुण्याला
येत होते त्यावेळी दोन्ही टोलनाक्यावर मारणेच्या पुढे-मागे असणाऱ्या शेकडो कारने टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणूक सुरू होती.
त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या.
कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन-तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहोचला.

दरम्यान, शरद मोहोळ गेल्या महिन्यात तुरुंगातून बाहेर आला असून इतरही काही गुंड सध्या बाहेर आले आहेत.
त्यामुळे पुण्यात पुन्हा वर्चस्वाचा संघर्ष सुरु होतो की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.

Related Posts