IMPIMP

Baramati News : बारामती शहरात पुन्हा वाढतोय ‘कोरोना’ !

by sikandershaikh
Coronavirus

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)कोरोनाबद्दल (corona) शहरात चिंतेचं वातावरण आहे. कारण कोरोना रुग्णांचा आकडा आज अचानक 37 पर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचा आकडा स्थिर होता. परंतु रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. त्यामुळं कालपासून बारामतीत मास्क अनिवार्य करण्यात आलं आहे.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अशी माहिती दिली की, कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. यात पुन्हा एकदा कोरोना संख्या वाढू नये सासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शहरात अनेक लोक हे मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. सॅनिटायजरचा वापर केला जात नाहीये. सोशल डिस्टेंसिंगही पाळलं जात नाही. त्यामुळं लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

लग्न आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही मोठी गर्दी जमताना दिसत आहे.
पोलिसांचं याकडे लक्ष नसल्याचं दिसत आहे. पूर्वीप्रमाणेच धुमधडाक्यात काही लग्न पार पडताना दिसत आहेत.
लोकांची संख्या नियंत्रणात नाही असंही चित्र काही ठिकाणी आहे.
परिणामी या सगळ्यामुळं आता पुन्हा रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे.

बारामती शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांवर आता पोलिसांनी पूर्वीप्रमाणेच दंडात्मक करावाई
अधिक प्रभावीपणे करण्याची मागणी होऊ लागली आहे.

एकत्र जीवन-मरणाची दिली होती वचनं अन् अखेर एकाच चितेवर पती-पत्नीवर अंत्यसंस्कार

Punjab Kings Xi IPL 2021 Auction : पंजाबच्या संघाने नावात का बदल केला ? कर्णधार केएल राहुलने केला खुलासा

नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढले, काळजी घेण्याचे आवाहन

Related Posts