IMPIMP

मुकेश अंबानींकडून PM केअर्स फंडासाठी 500 कोटी, तर अदानी ग्रुपकडून…

by pranjalishirish
corporates-banks-and-reliance-tata-group-and-other-enterprises-gave-crore-rupees-pm-cares-fund

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे या संकटाशी लढण्यासाठी आणि नागरिकांना मदतीसाठी पीएम केअर्स फंडामध्ये PM Care fund अनेकांनी देणग्या दिल्या होत्या. या देणगीदारांची माहिती दिली जात आहे. त्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांनी PM केअर्स फंडासाठी PM Care fund 500 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह अनेक मोठ्या उद्योगपतींनीही देणगी दिली आहे.

टाटा समूहाचे रतन टाटा, अदानी ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप या कंपन्यांकडूनही मोठ्या प्रमाणात देणग्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय बँकिंग क्षेत्रातूनही देणगी मिळाली आहे. त्यामध्ये खासगी बँक Bank असलेल्या HDFC, ICICI, कोटक महिंद्रा बँकेने Bank निधी दिला आहे. ICICI बँकेने Bank PM केअर्स फंडासाठी 80 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. HDFC बँकेने Bank 70 कोटी, तर कोटक महिंद्रा बँकेने Bank 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. इतकेच नाहीतर बँकेतील Bank कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून 1.9 कोटी रुपये जमा झाले आहेत.

आदित्य बिर्ला ग्रुपकडून 400 कोटी

टाटा समूहाकडून 500 कोटी रुपये, रिलायन्स कंपनीकडून 500 कोटी रुपये, आदित्य बिर्ला ग्रुपकडून 400 कोटी रुपये आणि अदानी ग्रुपकडून 100 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts