IMPIMP

Greenfield Expressway | आता दिल्ली-मुंबई प्रवास केवळ 13 तासात, वर्षाला 32 कोटी लिटर इंधन वाचणार

by nagesh
Greenfield Expressway | mumbai delhi journey expressway only 13 hours 32 crore liters fuel saved nitin gadkari

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबई (Delhi to Mumbai) यांना जोडणारा पर्यावरणपूरक असा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे (Greenfield Expressway) बनवला जाणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. २०२३ पर्यंत हे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून Greenfield Expressway एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली अंतर १५० किलोमीटरने कमी होऊन कवळ १३ तासात हा प्रवास करणे शक्य होईल.

 

ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे (Greenfield Expressway) साठी १ लाख कोटी खर्च करण्यात येणार असून दाेन प्रमुख महानगरांना जाेडणारा १३५०
किलाेमीटर लांबीचा हा ८ पदरी महामार्ग असणार आहे. या एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली अंतर १५० किलाेमीटरने होईलच तसेच वाहतुकीस अडथळे
कमी असल्याने दरवर्षी ३२ काेटी लीटर इंधनाची बचत देखील हाेईल, असा अंदाज आहे. सध्या महामार्गाचे ३५०किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या
महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वेळच वाचणार नाही तर बाजूने औद्याेगिक टाउनशिप आणि स्मार्ट शहरेही उभारण्याची याेजना आहे. संपूर्ण मार्गात ९२
ठिकाणी इंटरव्हल स्पाॅट विकसित करण्यात येणार आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ई-वाहनांसाठी ४ लेन राखीव

८ लेनचा हा महामार्ग असून त्यामध्ये दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन लेन म्हणजे चार लेन फक्त ई-वाहनांसाठी राहणार आहे. त्यासाठी ठराविक अंतरावर
चार्जिंगची साेय राहणार आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच एक्स्प्रेस-वे असणार आहे. यामुळे इंधनाही मोठी बचत होणार असून एकप्रकारे हा
पर्यावरणपूरक एक्स्प्रेस-वे ठरणार आहे.

 

मध्यप्रदेशातून या महामार्गाचा २४५किमी चा मार्ग जातो.
याठिकाणी १०० किमीचे काम पूर्ण झाले असून उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहणी करणार आहेत.
या महामार्गावर टोलनाके उभे करण्यात येणार आहेत. परंतु हे टोलनाके महामार्गा ऐवजी स्लिप लेनमध्ये असतील. त्यामुळे ज्या शहरात प्रवेश करायचा आहे, तेवढाच टाेल आकारण्यात येईल.

 

 Web Title : Greenfield Expressway | mumbai delhi journey expressway only 13 hours 32 crore liters fuel saved nitin gadkari

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | ‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – गोपीचंद पडळकर

Gold Price Update | सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या आता किती रूपयांना मिळतंय 1 तोळा सोने

तुमचा मोबाइल नंबर बदलला आहे का? तात्काळ Aadhaar Card सोबत करा लिंक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीनं केलं पत्नीच्या मोबाईलमध्ये ‘स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर’ सॉफ्टवेअर डाऊनलोड, पुढं झालं असं काही की प्रकरण…

 

Related Posts