IMPIMP

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु होणार नाहीत

by nagesh
Maharashtra School Reopen | maharashtra government stay on school reopen decision after meeting with task force

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Maharashtra School Reopen | शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासन निर्णय (GR) राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले होते. बुधवारी (11 ऑगस्ट) रोजी टास्क फोर्स (Task Force) सोबतच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर शाळा (Maharashtra School Reopen) सुरू करण्याच्या निर्णयाला शासनाकडून (State Government) स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. तसेच, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी (Collector) यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. या निर्णयाला आता राज्य सरकारनेच (State Government) स्थगिती दिली आहे.

 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona virus) अद्यापही कायम आहे आणि त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शाळा तुर्तास सुरू करु नयेत असा प्रवाह काही मंत्र्यांमध्ये दिसून येत आहे. टास्क फोर्सच्या (Task Force) बैठकीत देखील शाळा सुरू न करण्याची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

 

Web Title : Maharashtra School Reopen | maharashtra government stay on school reopen decision after meeting with task force

 

हे देखील वाचा :

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळणार आणखी 1 अपर आयुक्त, 2 DCP, 4 ACP; BDDS ला देखील राज्य शासनाची मंजुरी

PM Modi | ‘आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे’; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

Maharashtra Unlock | व्यावसायिकांना मोठा दिलासा ! राज्यात 15 ऑगस्टपासून मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार सुरु; पण मल्टिप्लेक्स, मंदिरे अन् प्रार्थनास्थळे बंदच

 

Related Posts